Kiccha Sudeep Mother Passed Away : कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीपची आईचे २० ऑक्टोबर रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. सरोजा संजीव असं त्याच्या आईचं नाव असून आईच्या निधनामुळे अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. किच्चाची आई सरोजा गेल्या अनेक वर्षांपासून आजाराशी झुंज देत होत्या. अखेर आज सरोजा संजीव यांनी अखेरचा श्वास घेतला. ई टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, २० ऑक्टोबरला किच्चाच्या आईने अखेरचा श्वास घेतला. बंगळुरु येथील एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. (Kiccha Sudeep Mother Passed Away)
आईच्या निधनामुळे किच्चा आणि त्याचं संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडालं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सरोजा शारीरिक व्याधींनी ग्रस्त होत्या. त्या कायम डॉक्टरांच्या देखरेखीखाली असायच्या. किच्चाच्या आईच्या निधनाने अभिनेत्याचे अनेक चाहते सोशल मीडियावर त्याच्या आईला श्रद्धांजली अर्पण करत आहेत. सुदीप तीन मुलांपैकी सर्वात लहान असून त्याला दोन मोठ्या बहिणी आहेत. या अभिनेत्यासाठी, चित्रपटसृष्टी आणि त्याचे चाहते त्याच्या आईच्या निधनाने शोक करत आहेत. त्यांचे सांत्वन केले.
ತೊಟ್ಟಿಲು ತೂಗೋಳಿಗೆ ಚಟ್ಟವ ಕಟ್ಟೋದೆಗೆ 🥺💔
— 𝗔 𝗥 𝗧 𝗜 𝗦 𝗧♪ (@MahiTweetxx) October 20, 2024
Om Shanti! 💐
Stay strong Bossuu @KicchaSudeep #RipSarojaAmma pic.twitter.com/q1ICTqK0Fl
किच्चा सुदीपच्या आईचं पार्थिव आज बंगळुरु येथील जेपी नगरमध्ये अभिनेत्याच्या घरी अंतिम दर्शनासाठी आणलं जाईल. किच्चाचे जवळते मित्र, नातेवाईक आणि मनोरंजन विश्वातील कलाकार किच्चाच्या आईचं अंतिम दर्शन घेतील. पुढे संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सरोजा संजीव यांच्यावर विल्सन गार्डन येथे अंतिम संस्कार केले जातील. किच्चा व त्याच्या कुटुंबासाठी हा दुःखद प्रसंग असून सर्वजण त्याला धीर देत आहेत.
दरम्यान, किच्चा सुदीपच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो सध्या ‘बिग बॉस कन्नड’ होस्ट करत आहे. २०२२ मध्ये विक्रांत रोना नंतरचा त्याचा पुढचा चित्रपट, ॲक्शन थ्रिलर मॅक्सच्या प्रदर्शनाची देखील वाट पाहत आहे. याआधी तो ‘मख्खी’ चित्रपटातून चांगलाच लोकप्रिय झाला होता. ज्यामध्ये त्याच्याबरोबर अभिनेत्री समंथादेखील होती.