बॉलिवूड अभिनेत्री काजोल सतत कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटांमुळे, तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे. अभिनेत्री सध्या तिच्या ‘दो पत्ती’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाची घोषणा झाली असून लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. अशातच, काजोलने काल टायगर श्रॉफच्या ‘गणपत’ चित्रपटाच्या प्रिमिअरला हजेरी लावली होती. यावेळी काजोलसह तिचा मुलगा युग देवगण या प्रिमिअरला आला होता. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. (Kajol viral video of Ganpath Premiere)
अभिनेता टायगर श्रॉफ व अभिनेत्री क्रिती सेनन यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘गणपत’ चित्रपट आज प्रदर्शित झाला. मात्र, त्याआधी खास प्रीमिअर शोचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, हेमा मालिनी, अनन्या पांडे, करण जोहर, रश्मिका मंदाना यांसारख्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी काजोल तिच्या मुलासह जेव्हा पापाराझींना पोझ देण्यासाठी रेड कार्पेटवर आली. तेव्हा तिचा मुलगा पॉपकॉर्न खाताना दिसला. तिचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे.
हे देखील वाचा – Ind Vs Ban : शुभमन गिलचं अर्ध शतक होताच सचिन तेंडुलकरची लेक साराचा एकच जल्लोष, ‘तो’ व्हिडीओ पाहिल्यानंतर अफेअर्सच्या चर्चांना उधाण
या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी युगचं कौतुक केलं आहे. तर, काहींनी त्याला ट्रोल केलं आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं, “विमल पान मसालाचा मुलगा.” तर दुसरा नेटकरी म्हणतो, “झोपेतून उठून याला घेऊन आले आहे. शिवाय, काहींनी तो अजय देवगणसारखा दिसत असल्याचे यात म्हटले आहे. एकूणच या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा रंगते.
हे देखील वाचा – कंगना रणौतच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन, बाळाला जवळ घेतल्यानंतर भावुक, म्हणाली, “मुलगा झाला आहे”
दरम्यान, काजोल लवकरच ‘दो पत्ती’ चित्रपटात झळकणार आहे. ज्यामध्ये ती क्रिती सेनन आणि साहिर शेखबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटात ती पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असून पहिल्यांदाच अश्याप्रकारची भूमिका साकारणार आहे.