गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’च्या घरात नील भट्ट व विकी जैन यांच्यात मारामारी, अंकिता लोखंडेच्या नवऱ्याला मारायला धावला अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 20, 2023 | 4:10 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Neil Bhatt on Vicky Jain

Bigg Boss 17 : 'बिग बॉस'च्या घरात नील भट्ट व विकी जैन यांच्यात मारामारी, अंकिता लोखंडेच्या नवऱ्याला मारायला धावला अन्…

Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस’ हा कार्यक्रम वादग्रस्त कार्यक्रमांपैकी एक आहे. आतापर्यंत झालेल्या प्रत्येक पर्वाने कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. हिंदी ‘बिग बॉस’ नंतर इतर भाषिक ‘बिग बॉस’च्या कार्यक्रमाचीही रंगत प्रेक्षकांमध्ये राहिली. अशातच सध्या हिंदी ‘बिग बॉस १७’ ची सर्वत्र क्रेझ पाहायला मिळतेय. सलमान खान होस्ट करत असलेल्या या ‘बिग बॉस’ने साऱ्यांनाच वेड लावलं आहे. यंदाच्या पर्वात नवनवीन बदल झालेले पाहायला मिळत आहेत. शिवाय स्पर्धकांमध्येही चुरशीची लढाई पाहायला मिळतेय.

सलमान खानच्या या वादग्रस्त शो ‘बिग बॉस १७’ ची सुरुवातच भांडणांपासून झालेली दिसतेय. यंदाच्या पर्वात स्पर्धकांना योग्य संबंध निर्माण करता आले नाहीत, तर काहींनी परस्पर शत्रुत्व स्वीकारायला सुरुवात केली आहे. मालिकाविश्वात लोकप्रिय असलेला अभिनेता नील भट्ट याने देखील ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री केली आहे. मात्र ‘बिग बॉस’च्या घरात त्याचा वावर तितकासा पाहायला मिळत नाही आहे. अशातच एका वादामुळे या शांत स्वभावाच्या नीलचा राग अनावर झालेला पाहायला मिळाला. याची झलक नुकत्याच आऊट झालेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Ind Vs Ban : शुभमन गिलचं अर्ध शतक होताच सचिन तेंडुलकरची लेक साराचा एकच जल्लोष, ‘तो’ व्हिडीओ पाहिल्यानंतर अफेअर्सच्या चर्चांना उधाण

‘बिग बॉस १७’च्या येणाऱ्या भागात शांत स्वभावाच्या नील भट्टचा संताप पाहायला मिळणार आहे. अंकिता लोखंडेचा पती विकी जैन त्याच्या रागाचे कारण ठरला आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये नील विकी जैनबरोबर भांडताना दिसत आहे. यावेळी नीलचा राग अनावर झालेला पाहून इतर स्पर्धक त्याला समजावताना दिसत आहेत. त्यानंतर विकी पुन्हा असं काहीतरी बोलतो ज्यामुळे नीलचा पारा चढतो आणि तो अंकिताच्या नवऱ्याला विकीला मारण्यासाठी धावतो. दरम्यान नीलचा चढलेला पारा पाहून त्याची पत्नी ऐश्वर्याने यामध्ये हस्तक्षेप केला आणि त्याला हे कृत्य करण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न केला.

आणखी वाचा – कंगना रणौतच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन, बाळाला जवळ घेतल्यानंतर भावुक, म्हणाली, “मुलगा झाला आहे”

नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा शोमध्ये आल्यापासून गोंधळलेले दिसत होते. दरम्यान ‘बिग बॉस’ने त्यांचा हा गोंधळ दूर केला आणि दोघांना घरात होणाऱ्या खेळामध्ये सक्रिय राहण्याचा सल्ला दिला. यानंतर ‘बिग बॉस’ने नीलला घरात तुझा लक्ष्य कोण असेल याबद्दल विचारले. यावर प्रत्युत्तर देत नीलने अंकिता व विकी हे नाव घेतलं. आता नीलला नेमका राग कशाचा आला आहे? याचा खुलासा अद्याप प्रोमोमध्ये करण्यात आलेला नाही. त्यामुळे निल व विकी यांच्यातील वाद नेमका कशामुळे झाला आहे हे पाहणं नक्कीच रंजक ठरणार आहे.

Tags: Abhishek kumarAishwarya SharmaAnurag Dobhalbigg bossbigg boss 17Bigg Boss 17 Ankita LokhandeBigg Boss 17 contestant list marathi newsBigg Boss 17 contestants list in marathiBigg Boss 17 marathi newsBigg Boss 17 salman khanBigg Boss 17:marathi batmyaBigg Boss marathi newseverything about Bigg Boss 17 contestantisha malviyaJigna VoraKhanzadiNeil BhattRinku Dhawansalman khanSana Raees KhanSoniya Bansalvicky jainअंकिता लोखंडेऐश्वर्या शर्मानील भटबिग बॉसबिग बॉस १७बिग बॉस १७ ग्रँड प्रिमिअरबिग बॉस १७ सलमान खानबिग बॉस १७ स्पर्धकांची यादीविकी जैन
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 divyanka sirohi death reason
Entertainment

सुप्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीचे वयाच्या ३०व्या वर्षी निधन, घरीच मृतावस्थेत आढळली, मृत्यूचे कारण…

एप्रिल 23, 2026 | 3:00 pm
veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Next Post
Kshitij Patwardhan post for 'Sajini Shinde ka Viral Video' director

"महाराष्ट्रात घडणारा हिंदी चित्रपट हवा", सुप्रसिद्ध मराठी चित्रपटाच्या लेखकाची पोस्ट चर्चेत, म्हणाला, "मराठी माणंस, संस्कृती…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.