शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“सत्याचाच विजय…”, जुई गडकरीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली, “ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघत…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 10, 2024 | 5:42 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Jui Gadkari shared a special post on social media about thrala tar mag serial see the details

“सत्याचाच विजय...”, जुई गडकरीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली, “ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघत...”

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांची आवडती मालिका ठरली आहे. या मालिकेतील अनेक ट्विस्टमुळे व कलाकारांच्या अभिनयामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. तर या मालिकेतील सायली-अर्जुन यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावतेय. या लोकप्रिय मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. जुईने आपल्या सोज्वळ अभिनयाने व निरागस सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

जुईने आपल्या सोज्वळ अभिनयाने व निरागस सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरदेखील तितकीच चर्चेत असते. सोशल मीडियावर मालिकेसंबंधित अनेक पोस्ट शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच तिने नुकतीच केलेली एक पोस्ट साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे.

जुईने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मालिकेसंबंधित एक पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टद्वारे तिने मालिकेतील नवीन ट्विस्टबद्दल सांगितले आहे. जुईन या पोस्टमध्ये “ज्या गोष्टीची तुम्ही सर्व वाट पाहत आहात ती लवकरच खरी होणार आहे.” असं म्हणत “सत्याचाच विजय होणार” असंही म्हटलं आहे. पण जुई नेमकं असं का म्हणाली? हे कळण्यासाठी तिने प्रेक्षकांना व चाहत्यांना ‘ठरलं तर मग’ ही मालिका पाहण्याचा सल्ला दिला आहे.

आणखी वाचा – अजय देवगणचा ‘शैतान’ ते इम्रान हाश्मीचा ‘शोटाइम’, येत्या आठवड्यात ओटीटीवर अनुभवता येणार मनोरंजनाची मेजवानी, जाणून घ्या…

अशातच नुकताच स्टार प्रवाहच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे मालिकेचा एक प्रोमो शेअर करण्यात आला असून या प्रोमोमध्ये अर्जुन व चैतन्यच्या बिघडलेल्या नात्याबद्दल सर्वांनीच सायलीला जबाबदार मानले आहे. अर्जुन-चैतन्य या दोन भावांमधील भांडणं सायलीला माहिती असूनही तिने याबद्दल कुणालाच काही सांगितले नाही. असा आरोप तिच्यावर करण्यात येतो.

आणखी वाचा – “पोटगीत मिळालेल्या पैशांमुळे मलायका आरोरा महागडे कपडे परिधान करते?” आरोप करणाऱ्या व्यक्तीवर भडकली अभिनेत्री, सडेतोड उत्तर देत म्हणाली…

दरम्यान, या सगळ्यात अर्जुन सायलीला पाठिंबा देत माझ्या आणि चैतन्यमधील भांडणात सायलीचा काहीही संबंध नाही असं म्हणतो. त्यामुळे सायली म्हणजेच जुईने शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे व नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या या नवीन प्रोमोमुळे अनेक प्रेक्षकांना पुढील भागात काय पाहायला मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Tags: entertainment newsjui gadkarimarathi actressMarathi Serial Entertainment NewsMarathi Serial NewsMarathi serials. Marathi NewsThrala Tar Magजुई गडकरीठरलं तर मगमनोरंजन बातमीमराठी अभिनेत्रीमराठी मालिका बातमीमराठी मालिका. मराठी बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Today 11 march panchang mesh to meen rashi bhavishya see the details

आजचे राशीभविष्य : ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस असणार खास, तर ‘या’ राशीच्या लोकांची होणार प्रगती, जाणून घ्या

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.