शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : रस्त्यांवर पाणीच पाणी, रिक्षामधून शूटसाठी पोहोचली जुई गडकरी, व्हिडीओद्वारे दाखवली परिस्थिती

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 24, 2025 | 1:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Jui gadkari viral video

Video : रस्त्यांवर पाणीच पाणी, रिक्षामधून शूटसाठी पोहोचली जुई गडकरी, व्हिडीओद्वारे दाखवली परिस्थिती

करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये सुपरहिट मालिका देत जुई गडकरीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. तिने छोट्या पडद्यावर विविध भूमिका साकारत अभिनेत्री म्हणून स्वतःला सिद्ध केलं. जुईची कामाप्रती असणारी जिद्द, चिकाटी तेवढीच आहे. मध्यंतरी ती आजारपणामुळे पुरती खचली होती. मात्र त्यामधूनही जुईने हिंमत हारली नाही. आजारपणावर मात करत तिने नव्या जोमाने काम करण्यास सुरुवात केली. इतकंच काय तर आजारी असतानाही ही शारीरिक त्रास सांभाळून शूट करायची. आताही तिची ‘ठरलं तर मग’ मालिका टॉपला आहे. शूटदरम्यान कितीही अडचणी आल्या, आजारी असली तरी जुई कामाला प्रथम प्राधान्य देते. (Jui gadkari viral video)

सोमवारपासून राज्यभरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. याचा फटका काही शहरांना बसला. दरम्यान काही ठिकाणी पावसाचं पाणीही साचलं. कामासाठी बाहेर पडलेल्यांना प्रवास करतानाही बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. जुईलाही याचा सामना करावा लागला. सकाळी शूटसाठी ती निघाली असताना जोरदार पाऊस होता. रस्त्यात पाणी साचलं होतं. मात्र जुई काही थांबली नाही.

आणखी वाचा – भजनात दंग, भक्तांना जेवण वाढलं आणि…; कोकणहार्टेड गर्ल पंढरपूरच्या यादीत नवऱ्यासह सहभागी, मनोभावे भक्ती अन् सेवा करताना…

रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं होतं. शिवाय वेळेत मालिकेच्या शूटसाठीही जुईला पोचायचं होतं. तिने एकाच ठिकाणी न थांबता रिक्षाने प्रवास करायचा ठरवलं. रिक्षाने प्रवास करत असताना रस्तेही जलमय झाले होते. पाणी साचलेल्या रस्त्यांमधूनच ती शूटसाठी पुढे गेली. यादरम्यानचा संपूर्ण प्रकार तिने कॅमेऱ्यात कैद केला. व्हिडीओ शूट करत तिने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे चाहत्यांसह शेअर केला आहे. तसेच तिने व्हिडीओला हटके कॅप्शनही दिलं आहे.

आणखी वाचा – “कोणाचं घर तोडायला प्रेम केलं नाही”, अरुणा इराणी यांचं लग्नाबाबत भाष्य, म्हणाल्या, “तुमचा नवरा…”

“सकाळी बोट राइड करत शूटला आले” असं कॅप्शन जुईने दिलं. रस्त्यांवर तुडूंब पाणी भरलेलं दिसत आहे. यामधील राग येणारी गोष्ट म्हणजे पाण्यामध्ये प्लॅस्टिक, इतर कचरा तरंगताना दिसत आहे. सर्वसामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटींनाही अनेक सामाजिक प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. कित्येकदा तर मढ परिसरात शूटसाठी जात असताना कलाकारांना ट्राफिकचाही सामना करावा लागतो. पावसात तर ट्राफिकच्या समस्या आणखीनच वाढतात. अजूनही रस्त्यांवर पाणी भरणं, ट्राफिक या समस्या जैसे थेच आहेत.

Tags: entertainment newsjui gadkarimarathi actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Neena Gupta On Her Dressing

एकीकडे फॅशनची आवड अन् खिशात पैसे नसणे; नीना गुप्ता यांचं कठीण काळाबाबत भाष्य, म्हणाल्या, "कपड्यांच्या बाबतीत…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.