मोठ्या पडद्यावर दिसणाऱ्या अनेक गोष्टींमागे काही ना काही अशी गोष्ट घडलेली असते कि ज्या मुळे असं घडलं असत तर काय झालं असत किंवा दिसणार चित्रकस दिसलं असत याबद्दल प्रेक्षक उत्सुक असतात. मोठा पडदा गाजवलेल्या अभिनेत्री आधी छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या असतात. असच काहीस झालेलं अभिनेत्री जुही चावला सोबत.(Juhi chawla as draupadi)
जर तेव्हा काही गोष्ट सकारात्मक पद्धतीने घडल्या असत्या तर जुहीच्या गाजलेल्या भूमिकांमध्ये ही भूमिका अतिशय गाजली असती. बी आर चोप्रा यांच्या गाजलेल्या मालिकांमध्ये आजही प्रचंड प्रमाणात पहिली जाते ती पौराणिक मालिका म्हणजे महाभारत.

या महाभारतात काम केलेलं प्रत्येक पात्र घराघरात प्रसिद्ध झालं या मालिकेत महारभारतातील महत्वाच्या पात्रांपैकी एक महत्वाचं पात्र म्हणजे द्रौपदी हे पात्र आधी जुही चावला साकारणार होती असं ललिता ताम्हणे यांनी घेतलेल्या मुलाखतीत जुही ने सांगितलं आहे.बी आर चोप्रा यांच्या महाभारतात असलेली सगळ पात्र चांगलीच चर्चेत ठरली त्यामध्ये असलेलं द्रौपदी जुही ने साकारलं असत तर ते ही चांगलंच गाजलं असत.(Juhi chawla as draupadi)
====
हे देखील वाचा – या कलाकारांनी पटकावला स्टार प्रवाह परिवार पुरस्कार
====
जेव्हा जुहीला हे मालिका नाकारण्याचं कारण विचारण्यात आलं तेव्हा तिने द्रौपदी हे पात्र साकारणं मला आवडलं असतं पण एकीकडे पौराणीक मालिकेत द्रौपदी साकारायची आणि दुसरीकडे चित्रपटांमध्ये शॉर्ट कपडे, स्कर्ट्स घालायचे ते बरोबर दिसलं नसतं म्हणून मी महाभारत सोडलं असं जुही ने सांगितलं.त्या काळी एका मालिकेसाठी अनेक कमर्शियल चित्रपट सोडण शक्य नव्हतं त्यामुळे मी नाईलाजाने मालिकेसाठी नकार दिला अस जुही ने सांगितलं.जुही ने त्यानंतर बॉलीवूड मध्ये केलेलं काम, अनेक चित्रपट या सगळ्यांमुळे यशस्वी अभिनेत्रींनमध्ये जुही चं नाव घेतलं जातं.