शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“महाराष्ट्राचा अपमान…”, एल्विश यादवने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरच्या बाप्पाची केली आरती, जितेंद्र आव्हाडांचा संताप, म्हणाले, “खालच्या स्तरावर जाऊन…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 26, 2023 | 7:19 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Jitendra Awhad on Elvish Yadav

“महाराष्ट्राचा अपमान...”, एल्विश यादवने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरच्या बाप्पाची केली आरती, जितेंद्र आव्हाडांचा संताप, म्हणाले, “खालच्या स्तरावर जाऊन...”

राज्यभरात सर्वत्र गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. त्यानिमित्ताने बॉलिवूड व मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार सार्वजनिक मंडळांच्या बाप्पाचे दर्शन घेत आहे. त्याचबरोबर घरच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी कलाकार मंडळी एकमेकांच्या घरी भेटी देताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी बॉलिवूडसह टीव्ही विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. (Jitendra Awhad on Elvish Yadav)

यावेळी अनेक कलाकारांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंच्या घरातील बाप्पाची आरती पार पडली. ‘बिग बॉस ओटीटी’ फेम एल्विश यादवदेखील बाप्पाच्या आरतीत सहभागी झाला होता. मात्र ही बाब आमदार जितेंद्र आव्हाड यांना खटकली. ट्विटरद्वारे त्यांनी एल्विशवर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी नुकताच एक ट्विट करत एल्विश यादवबरोबर एकनाथ शिंदेंवरही निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी वर्षा बंगल्यावरील आरतीचा फोटो आणि त्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

हे देखील वाचा – “गणपतीसमोर उड्या मारताना वयाचा विसर पडतो का?”, निळु फुलेंच्या लेकीने नक्की कोणत्या कलाकारांना सुनावलं?, म्हणाली, “वडेचाळे करण्यामागे…”

हा व्हिडिओ पोस्ट करत ते यामध्ये म्हणाले, “एल्विश यादव सारख्या कृप्रसिद्ध युट्युबर आणि सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सरला या राज्याचे मुख्यमंत्री आपल्या शासकीय निवासस्थानी गणेश आरतीसाठी बोलवत असतील, तर तो या पुरोगामी महाराष्ट्राचा अपमान आहे. या माणसाने महिलांच्या बाबतीत अतिशय खालच्या स्तरावर जाऊन अनेक विधाने केली आहेत. याच्या मते स्त्रियांना मेंदू कमी असतो, बाई ही फक्त चूल आणि मुलं सांभाळण्यासाठीच असते, तिने तेवढंच करावं. हा प्रकार म्हणजे सरळ सरळ फुले दाम्पत्य, शाहू महाराज, आंबेडकर साहेब यांच्यासारख्या महान विभूतींनी स्त्री उद्धाराचं जे कार्य केलं आहे, त्याचा अपमान आहे. पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी ही घटना आहे.”

एल्विश यादव सारख्या
कृप्रसिद्ध युट्युबर आणि सो कॉल्ड सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर ला या राज्याचे मुख्यमंत्री आपल्या शासकीय निवासस्थानी,गणेश आरतीसाठी बोलवत असतील,तर तो या पुरोगामी महाराष्ट्राचा अपमान आहे.

महिलांच्या बाबतीत अतिशय खालच्या स्तरावर जाऊन या माणसाने अनेक स्टेटमेंट दिले… pic.twitter.com/oOYbVYSSOw

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 25, 2023

हे देखील वाचा – “आता पायामध्येही ताकद नाही”, सध्या अशी आहे धर्मेंद्र यांची अवस्था, म्हणाले, “माझे डोळे…”

युट्युबर आणि सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर असलेला एल्विश ‘बिग बॉस ओटीटी’चे विजेतेपद पटकावल्यानंतर बराच लाइमलाईटमध्ये आला आहे. या शोनंतर तो अनेक कार्यक्रमांमध्ये दिसला. याबरोबर अभिनेत्री उर्वशी रौतेलाबरोबर एका म्युझिक व्हिडिओमध्ये तो नुकताच झळकला आहे.

Tags: eknath shindeelvish yadavjitendra awhadJitendra Awhad on Elvish Yadav and Eknath Shindetwitter
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Samir Choughule On Sonali Kulkarni

सोनाली कुलकर्णीने 'ती' मुर्ती देऊन समीर चौघुलेंचा केला सन्मान, म्हणाली, "ज्या क्षणी माझ्या हातात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.