रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता चव्हाणचं मंगळसूत्र इतर अभिनेत्रींपेक्षा आहे फारच युनिक, खास डिझाइनने वेधलं लक्ष

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 4, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Yogita Chavan And Saorabh Chaughule Wedding

'जीव माझा गुंतला' फेम योगिता चव्हाणचं मंगळसूत्र इतर अभिनेत्रींपेक्षा आहे फारच युनिक, खास डिझाइनने वेधलं लक्ष

सिनेसृष्टीत कलाकारांची लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अशातच या कलाकार मंडळींच्या खास लूकची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकले असून प्रत्येक जोडीच्या खास लूकने व शाही अंदाजाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तर अभिनेत्रींच्या लूकसह त्यांच्या मंगळसूत्राचीही जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. अभिनेत्री तितीक्षा तावडे, प्रथमेश परबची पत्नी क्षितिजा, तसेच सुरुची अडारकर यांच्या गळ्यातील मंगळसूत्राची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. यानंतर आता एक मराठमोळ्या अभिनेत्रीच्या लग्नाची व तिच्या मंगळसूत्राची चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. (Yogita Chavan And Saorabh Chaughule Wedding)

‘जीव माझा गुंतला’ फेम अभिनेत्री योगिता चव्हाण नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. योगिताने तिचा मालिकेतीलचं जोडीदार अभिनेता सौरभ चौघुलेसह लग्नगाठ बांधली आहे. ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून अंतरा व मल्हार ही जोडी घराघरांत पोहोचली. या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली ही जोडी आता लग्नबंधनात अडकली आहे. योगिता व सौरभ यांनी थेट लग्नाचे फोटो शेअर करत त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली चाहत्यांना दिली. योगिता व सौरभच्या लग्नातील अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मिडियावर धुमाकूळ घालताना पाहायला मिळाले.

आणखी वाचा – छत्तीसगढच्या रितेश पालने पटकावलं ‘डान्स प्लस प्रो’ शोचं विजेतेपद, सलॉनमध्ये करत होता काम, आता मिळाली इतकी रक्कम

View this post on Instagram

A post shared by Yogita Chavan (@official_chavan_yogita)

नववधूवराच्या लूकमध्ये योगिता व सौरभ खूपच सुंदर दिसत होते. योगिताच्या गळ्यात मंगळसूत्र घालतानाचा दोघांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. यांत योगिताच्या हटके मंगळसूत्राने लक्ष वेधून घेतलं आहे. पारंपरिक असं हे योगिताचं मंगळसूत्र खूप खास आहे. मंगळसूत्राला असलेल्या दोन वाट्यांवर बारीक नक्षीकाम केलेलं पाहायला मिळालं. तर नक्षीदार अशा या मंगळसूत्रात काळ्या मण्यांहून सोन्याच्या मण्यांचा अधिक वापर केलेला पाहायला मिळाला. योगिताच्या या मंगळसूत्राची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळाली.

आणखी वाचा – Video : अनंत अंबानीने सलमान खानला उचलून घेण्याचा केला प्रयत्न पण घडलं भलतंच, बॉडीगार्ड शेरा धावून आला अन्…; व्हिडीओ व्हायरल

३ मार्चला सौरभ व योगिता यांचा लग्नसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. त्यांच्या लग्नाला सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी उपस्थिती लावली होती. सध्या योगिता व सौरभच्या विवाहसोहळातील फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहेत. सौरभ व योगिता यांच्या लग्नातील व्हायरल व्हिडीओमध्ये त्यांच्या लग्नातील सातफेरे, वरात, वरमाला व लग्नविधींची झलक पाहायला मिळत आहे.

Tags: jeev majha guntalaYogita Chavan and Saorabh ChaughuleYogita Chavan and Saorabh Chaughule Weddingyogita chavan mangalsutra designyogita chavan wedding look
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
actor shyam rajput

"सतत खानदेशी भाषेत स्किट करणं कंटाळवाणं वाटतं का?", इतके वर्ष काम केल्यानंतर श्याम राजपूत यांना काय वाटतं?, म्हणाले, "कधी कधी वाटतं की…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.