सिनेसृष्टीत कलाकारांची लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अशातच या कलाकार मंडळींच्या खास लूकची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकले असून प्रत्येक जोडीच्या खास लूकने व शाही अंदाजाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तर अभिनेत्रींच्या लूकसह त्यांच्या मंगळसूत्राचीही जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. अभिनेत्री तितीक्षा तावडे, प्रथमेश परबची पत्नी क्षितिजा, तसेच सुरुची अडारकर यांच्या गळ्यातील मंगळसूत्राची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. यानंतर आता एक मराठमोळ्या अभिनेत्रीच्या लग्नाची व तिच्या मंगळसूत्राची चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. (Yogita Chavan And Saorabh Chaughule Wedding)
‘जीव माझा गुंतला’ फेम अभिनेत्री योगिता चव्हाण नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. योगिताने तिचा मालिकेतीलचं जोडीदार अभिनेता सौरभ चौघुलेसह लग्नगाठ बांधली आहे. ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून अंतरा व मल्हार ही जोडी घराघरांत पोहोचली. या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली ही जोडी आता लग्नबंधनात अडकली आहे. योगिता व सौरभ यांनी थेट लग्नाचे फोटो शेअर करत त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली चाहत्यांना दिली. योगिता व सौरभच्या लग्नातील अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मिडियावर धुमाकूळ घालताना पाहायला मिळाले.
नववधूवराच्या लूकमध्ये योगिता व सौरभ खूपच सुंदर दिसत होते. योगिताच्या गळ्यात मंगळसूत्र घालतानाचा दोघांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. यांत योगिताच्या हटके मंगळसूत्राने लक्ष वेधून घेतलं आहे. पारंपरिक असं हे योगिताचं मंगळसूत्र खूप खास आहे. मंगळसूत्राला असलेल्या दोन वाट्यांवर बारीक नक्षीकाम केलेलं पाहायला मिळालं. तर नक्षीदार अशा या मंगळसूत्रात काळ्या मण्यांहून सोन्याच्या मण्यांचा अधिक वापर केलेला पाहायला मिळाला. योगिताच्या या मंगळसूत्राची सर्वत्र चर्चा रंगलेली पाहायला मिळाली.
३ मार्चला सौरभ व योगिता यांचा लग्नसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. त्यांच्या लग्नाला सिनेसृष्टीतील बऱ्याच कलाकारांनी उपस्थिती लावली होती. सध्या योगिता व सौरभच्या विवाहसोहळातील फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना पाहायला मिळत आहेत. सौरभ व योगिता यांच्या लग्नातील व्हायरल व्हिडीओमध्ये त्यांच्या लग्नातील सातफेरे, वरात, वरमाला व लग्नविधींची झलक पाहायला मिळत आहे.