ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन मंगळवारी मुंबईत त्यांच्या आगामी रोमँटिक चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’च्या स्क्रीनिंगच्या वेळी पापराजींवर नाराज झाल्या.(Jaya Bachchan Gets Angry)
स्क्रिनिंगला उपस्थित राहण्यासाठी ती तिचा मुलगा अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चनसोबत पोहोचली होती. यावेळीचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. कार्यक्रमस्थळी प्रवेश करताच त्या श्वेता आणि अभिषेकसाठी क्षणभर थांबल्या. दरम्यान, पापाराजी त्यांना फोटो क्लिक करण्यासाठी हाक मारू लागले.
पाहा फोटोग्राफर्सवर का रागावल्या जया बच्चन (Jaya Bachchan Gets Angry)
जया जी, जया जी असे ते बोलताना दिसत आहेत. त्याचवेळी जया बच्चन या मागे वळून पाहतात आणि “मला ऐकू येतं. मी बहिरी नाही. थोडं हळू बोला’, असे रागात बोलतात.आणि नंतर त्यांच्या मुलांसह त्या थिएटरमध्ये प्रवेश करताना दिसल्या. बरं, जया बच्चनने पापाराझींना फटकारण्याची ही पहिलीच वेळ नाही, त्या नेहमीच पापाराझींसोबत वाद घालताना दिसतात.
त्यांच्या वायरल झालेल्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. “याच कारणामुळे आम्हाला रेखा आवडतात. त्या अजिबात भडकत नाही आणि अटीट्युडही दाखवत नाहीत”, असे एकाने कमेंट करत म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने, “हिच्याबरोबर ऐश्वर्या कशी राहत असेल” अशी देखील कमेंट केली आहे.
हे देखील वाचा – लेकीसह ‘बार्बी’ चित्रपट पाहायला गेलेली जुही परमार १० मिनिटांतच थिएटरमधून बाहेर, म्हणाली, “आक्षेपार्ह सीन्स…”
करण जोहर दिग्दर्शित, रणवीर सिंग, आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २८ जुलै रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
‘रॉकी और राणी की कहाणी’च्या स्पेशल स्क्रिनिंगला अभिनेता रणवीर सिंग, आलिया भट्ट, रणबीर कपूर, करिश्मा कपूर, विकी कौशल, कतरिना कैफ, नेहा धुपिया, सारा अली खान, अनन्या पांडे, इब्राहिम अली खान आणि चंकी पांडे यांसारख्या अनेक मोठ्या बी-टाउन कलाकारांनी या स्पेशल स्क्रिनिंगला हजेरी लावली.
