सध्या बॉलीवूडमध्ये एकाच सिनेमाची जोरदार चर्चा रंगली आहे, ती म्हणजे किंग खान शाहरुखचा आगामी सिनेमा “जवान”. या सिनेमाचा टिझर जेव्हा समोर आला, तेव्हा शाहरुखचा हा डॅशिंग अवतार चाहत्यांना प्रचंड आवडला होता. सिनेमाचे प्रमोशन जोरदार सुरू असून सिनेप्रेमी हा सिनेमा पाहण्यासाठी आतुरलेले आहे. (Jawan new poster out)
आतापर्यंत सिनेमातील नायक व नायिकेचे लुक समोर आल्यानंतर आता सिनेमातील खलनायकाचा लुकही समोर आला असून साऊथचा प्रसिद्ध अभिनेता विजय सेतुपती खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
पहा ‘जवान’च्या खलनायकाचा फर्स्ट लुक (Jawan new poster out)
सिनेमाचा नायक शाहरुखने खलनायक विजय सेतुपतीचा फर्स्ट लूक पोस्टर शेअर केलं असून विजयच्या पोस्टवरवर “The Dealer of DEATH” असं कॅप्शन लिहिलं आहे. हे पोस्टर शेअर करताना शाहरुखने लिहिलंय, “There’s no stopping him… or is there? Watch out!”. या नव्या पोस्टरवर शाहरुखसह विजयच्या चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. सिनेमाच्या निमित्ताने अभिनेता विजय सेतुपती पहिल्यांदाच किंग खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. (Vijay Sethupathi)
साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक एटली हे या सिनेमाचे दिग्दर्शन करत असून यात शाहरुख व विजय सेतुपती व्यतिरिक्त अभिनेत्री नयनतारा, प्रियमणी, सान्या मल्होत्रा, सुनील ग्रोव्हर व मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री दीपिका पदुकोण ही पाहुण्या कलाकाराच्या रूपात दिसणार आहे. शाहरुखची ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ या सिनेमाची निर्मिती केली असून ७ सप्टेंबरला सिनेमा जगभरातील सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे. (Jawan new poster out)
हे देखील वाचा : मला या नावाने रितेश हाक मारायचा, त्यामुळे सासूबाई गोंधळून गेल्या; जिनिलियाने केला खुलासा