शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेण्याचा जावेद अख्तर यांना पश्चाताप, म्हणाले, “लग्न यशस्वी न होण्यामागे…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 24, 2024 | 2:57 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Javed Akhtar On First Marriage

जावेद अख्तर यांनी त्यांच्या पहिल्या लग्नाबद्दल केलेलं भाष्य चर्चेत, घटस्फोटानंतर ते नेमकं काय म्हणाले...

जावेद अख्तर व सलीम खान यांची डॉक्युमेंट्री सीरिज ‘अँग्री यंग मेन’ या दोघांच्या करिअर व वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य करणारी आहे. याद्वारे जावेद अख्तर, सलीम खान यांच्या चाहत्यांना त्यांच्या जुन्या दिवसांबद्दल माहिती मिळू शकते. जावेद व सलीम ही जोडी बॉलिवूड सिनेविश्वात खूप गाजली होती. या डॉक्युमेंट्री सीरिजच्या तिसऱ्या भागात, जावेद अख्तर यांनी त्यांची पहिल्या लग्नाबद्दल भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी हनी इराणीबद्दल त्यांची मनात अपराधीपणाची भावना असल्याचे कबूल केले. ते म्हणाले की, लग्न यशस्वी न होण्यासाठी अधिक जबाबदार ते स्वतःला मानतात. सुमारे ६०-७० टक्के अपराधी ते स्वतःला मानतात. (Javed Akhtar On First Marriage)

जावेद अख्तर यांनी कबूल केले की, जर त्यांच्याकडे आज जी समज आहे ती असती तर त्यांच्या पहिल्या लग्नाबाबत परिस्थिती काहीशी वेगळी असती. त्याचवेळी जावेद अख्तरची दुसरी पत्नी शबाना आझमी यांनीही जावेद अख्तरबरोबर नवीन नात्याचा विचार केला होता, ज्यात मुलेही सहभागी होती. त्यांनी कबूल केले की अशी परिस्थिती अतिशय वैयक्तिक व वेदनादायक असतात. यामुळे त्यांना कोणी घर तोडणारा किंवा घराचा नाश करणारा असेही म्हटले.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : बाई‌‌ऽऽऽऽऽ…; अभिजीतने निक्कीच्या वाढदिवसानिमित्त गायलं ‘हे’ खास गाणं, दोघांच्या मैत्रीची जोरदार चर्चा, शुद्ध मैत्री की Strategy?

शबाना आझमी यांनी जावेद अख्तर यांची पहिली पत्नी हनी इराणी यांना श्रेय दिले की त्यांनी आपल्या मुलांना त्यांच्या विरोधात वळवले नाही. हनीने मुलांना सुरक्षा प्रदान करण्यात कोणतीही कसर पडू दिली नाही. आणि त्यामुळेच मुलांनी शबानाकडे केव्हाही सावत्र आईच्या नजरेने पाहिले नाही. शबाना व हनी यांचेही एकमेकांशी चांगले संबंध आहेत.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “भाऊ जान्हवी, निक्कीचीच लायकी काढा”, रितेश देशमुखला प्रेक्षकांचा सल्ला, म्हणाले, “टीम एची वाट लावा आणि…”

हनी इराणी व जावेद अख्तर यांचा विवाह १९७२ मध्ये झाला होता आणि त्यांना फरहान अख्तर, झोया अख्तर ही दोन मुले आहेत. फरहान एक बॉलिवूड अभिनेता आहे आणि त्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तर झोया अख्तर ही एक प्रसिद्ध चित्रपट निर्माती आहे. १९८४ मध्ये हनी व जावेद यांचा घटस्फोट झाला. यानंतर जावेदने शबाना आझमीशी लग्न केले.

Tags: Javed Akhtar On First Marriagejaved akhtar on honey iranijaved akhtar on wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi  Season 5

Bigg Boss Marathi : "तुमचा माज, दादागिरी बंद होणार…", रितेश देशमुख जान्हवी किल्लेकरला घराबाहेर काढणार, रडत बाहेर निघाली अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.