Jammu And Kashmir Pahalgam Terrorist Attack Sunny Deol : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पापांनी आपला जीव गमावला. मंगळवारी घडलेल्या या घटनेनंतर संपूर्ण देशच हादरला आहे. या हल्ल्यामध्ये कोणी पती, कोणी वडील, कोणी मुलगा गमावला. या संपूर्ण घटनेमधून एक महत्त्वाची माहितीही समोर आली. यामध्ये फक्त पुरुषांना टार्गेट केलं गेलं. पुरुष पर्यटकांवर अधिकाधिक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यादरम्यानची भयावह दृश्य समोर आली आहेत. अशातच कलाकार मंडळीही याबाबत संताप व्यक्त करत आहेत. त्यातच सनी देओलने मृतांना श्रद्धांजली वाहणारी पोस्ट शेअर केली आहे. मात्र त्याला ट्रोल करण्यात आलं आहे. (sunny deol troll for support pakistan)
काय म्हणाला सनी देओल?
सनी देओलने पोस्ट शेअर करत या हल्ल्याचा निषेध केला. तसेच संताप व्यक्त केला. तो म्हणाला, “दहशतवाद्यांना संपवणं हाच या देशाचा आता उद्देश हवा. कारण या हल्ल्यांमुळे फक्त सामान्य लोकांनाच त्यांचा जीव गमवावा लागतो. प्रत्येकाला स्वतःला पडताळून पाहण्याची गरज आहे. या घटनेमध्ये मी पीडित कुटुंबियांच्या बरोबर आहे”. सनीने ही पोस्ट करताच कमेंट्सच्या माध्यमातून अनेकांनी त्याला ट्रोल केलं.
आणखी वाचा – “’काश्मीर फाइल्स’ला नावं ठेवली आता तेच झालं”, पहलगाम हल्ल्यानंतर अनुपम खेर भडकले, बॉलिवूड कलाकारांचाही संताप
एका युजरने म्हटलं की, “तूच तर पाकिस्तानी कलाकारांना काम द्या असं म्हटलं होतं”. दुसऱ्या एका युजरने लिहिलं की, “जाट चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तू एक विधान केलं होतं. पाकिस्तानी कलाकारांना भारतात येण्यापासून थांबवू नका. कला ही सगळ्या सीमारेषांपलिकडची असते. तुमच्या सारख्या लोकांच्या अशा विचारांमुळेच हे सारं घडलं आहे”. सनी देओलला कमेंट्सच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं आहे. मात्र ट्रोल करण्याची ही वेळ आहे का? हाही मुद्दा यामधून समोर येतो.
आणखी वाचा – “हल्लेखोर स्थानिक मदतीशिवाय पोहोचलेच कसे?, घरात घुसून मारा”, पहलगाम हल्ल्याप्रकरणी मराठी कलाकार भडकले
इस समय दुनिया की सोच सिर्फ़ आतंकवाद को खत्म करने की होनी चाहिए क्यूंकि इसका शिकार सिर्फ़ मासूम लोग ही होते है ,इंसान को अपने अंदर झांकने की जरूरत है।
— Sunny Deol (@iamsunnydeol) April 23, 2025
इस दुख की घड़ी में मैं पीड़ित परिवारों के साथ खड़ा हूं।
#PahalgamTerroristAttack
सनी देओलने नक्की काय म्हटलं होतं?
‘जाट’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सनी देओलला अभिनेता फवाद खानच्या कमबॅकबाबत विचारण्यात आलं होतं. तेव्हा तो म्हणालेला, “मी या राजकीय विषयांमध्ये बोलू इच्छित नाही. कारण इथूनच अनेक वादांना तोंड फुटतं. आम्ही कलाकार आहोत. दुनियाभर असलेल्या प्रेक्षकांसाठी आम्ही काम करतो. लोकांनी आम्हाला पाहिलं नाही तरी आम्ही काम करतो. आपल्याला अधिकाधिक देशांचं स्वागत केलं पाहिजे. असंच कायम असलं पाहिजे”. सनीला आता ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.