पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये निष्पाप पर्यटकांनी आपला जीव गमावला. या हल्ल्यामध्ये पुरुष पर्यटकांनाच टार्गेट करण्यात आलं असल्याचं निदर्शनास आलं. काही कुटुंबातील कर्ते पुरुषच हल्ल्यात मृत पावले. तर पत्नी, मुलीने डोळ्यांदेखत आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावलं. ही संपूर्ण घटना ऐकतानाच अंगाचा थरकाप उडतो. तिथे उपस्थित असलेल्या पर्यटकांची अवस्था काय झाली असेल? हे विचार करणंही अवघड जात आहे. अशातच देशभरातील विविध मंडळी आपला राग व्यक्त करत आहेत. यामध्ये कलाकार मंडळींचाही समावेश आहे. अशातच सुप्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. (shatrughan Sinha on pahalgam terror attack)
पहलगाम हल्ल्याबाबत अनेक कलाकार आपलं मत मांडत आहेत. अशातच शत्रुघ्न यांनाही या हल्ल्याबाबत विचारण्यात आलं. यावेळी त्यांनी दिलेलं उत्तर धक्कादायक होतं. हा हल्ला फक्त प्रोपगंडा असल्याचं शत्रुघ्न यांचं म्हणणं आहे. पहलगाम हल्ला प्रकरण तापलं असताना लोकांना शांत बसण्याचीही त्यांनी विनंती केली. त्यांच्या मते संतापलेल्या वातावरणात लोकांनी शांत राहावं. यावरुनच अनेकांनी कमेंट्स करण्यास सुरुवात केली.
शत्रुघ्न सिन्हा नक्की काय म्हणाले?
पहलगाम हल्ल्याबाबत विचारताच शत्रुघ्न म्हणाले, “काय घटना घडली आहे?. यावर प्रश्न विचारणाऱ्याने म्हटलं की, तिथे हिंदूबरोबर जे घडलं…”. प्रश्न विचारणाऱ्याचं वाक्य शत्रुघ्न सिन्हा यांनी पूर्णही होऊ दिलं नाही. ते म्हणाले, “हे हिंदू, हिंदू का बोलत आहात?. हिंदू मुसलमान सगळेच भारतीय आहेत. मीडिया हे सगळं प्रकरण अधिकच उचलून धरत आहे. प्रोपगंडा युद्ध जरा जास्तच सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या ग्रुपकडून हे जरा जास्तच सुरु आहे”.
आणखी वाचा – हाताला काळी पट्टी बांधून १३ दिवस दुःख पाळणार, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा निर्णय, म्हणाल्या, “दिखावा नाही…”
शत्रुघ्न सिन्हांमुळे लोकांचा संताप
पुढे ते म्हणाले, “हा खूपच भावनिक मुद्दा आहे. याच्या मुळाशी जाऊन याचा विचार केला पाहिजे. ज्यामुळे तणाव वाढेल अशा कोणत्याच गोष्टी आपण करणं टाळलं पाहिजे. आता जखमेवर मलमपट्टी करण्याची गरज आहे”. शत्रुघ्न यांचं हे वक्तव्य ऐकून अनेकांनी त्यांना चांगलंच सुनावलं. यांच्या मुलीचं लग्न मुस्लिम कुटुंबात झालं ना म्हणून असं बोलत आहेत, सगळेच एक आहे तर हिंदू विचारुन गोळीबार का केला?, यांची का जळत आहे? अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.