जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेनंतर देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो व व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आलं. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमध्ये अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं. हे दुःख आभाळापेक्षा खूप मोठं आहे. या हल्ल्याचा सगळ्या स्थरातून निषेध होत आहे. अनेक कलाकार मंडळींनी याबाबत पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला. तसेच “आता घुसून मारा” असं म्हटलं. आता सचिन पिळगावकर यांच्य पत्नी सुप्रिया पिळगावकर यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. (supriya pilgaonkar on pahalgam terror attack)
सुप्रिया पिळगांवकरांचा महत्त्वपूर्ण निर्णय
सुप्रिया यांनी सोशल मीडियाद्वारे पहलगाम हल्ल्याप्रकरणी दुःख व्यक्त केलं. मात्र त्या इथवरच थांबल्या नाहीत. त्यांनी या घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींसाठी एक निर्णय घेतला आहे. त्या म्हणाल्या, “Show must go on. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं निधन झालं तर आपण १३ दिवसांचं दुःख पाळतो. त्यानंतरच आपण आपलं पुढचं आयुष्य जगतो. मीही आता हे दुःख पाळणार आहे. मी माझ्या हाताच्या दंडाला काळ्या रंगाची पट्टी बांधणार आहे”.
आणखी वाचा – “हल्लेखोर स्थानिक मदतीशिवाय पोहोचलेच कसे?, घरात घुसून मारा”, पहलगाम हल्ल्याप्रकरणी मराठी कलाकार भडकले
“मला हृदयापासून किती दुःख झालं आहे हे यामधूनच कळेल. तुम्हीही माझ्याबरोबर हाताला ही काळी पट्टी बांधून दुःख व्यक्त करु शकता. त्यापुढे मी माझं आनंदी आयुष्य जगत राहणार”. पुढे त्या म्हणाल्या, “हा दिखावा आहे असं कृपया म्हणू नका. मला यामधूम माझ्या भावना व्यक्त करायच्या आहेत. मला यामधून दुःख व्यक्त करत असल्याची भावना मनात निर्माण होते”.

आणखी वाचा – “’काश्मीर फाइल्स’ला नावं ठेवली आता तेच झालं”, पहलगाम हल्ल्यानंतर अनुपम खेर भडकले, बॉलिवूड कलाकारांचाही संताप
हाताला काळी पट्टी बांधून फोटो
सुप्रिया यांनी पुढे सांगितलं की, “मी याद्वारे कोणतंच आवाहन करत नाही. मला टॅग करु नका किंवा फोटो पाठवू नका. तुम्ही तुमच्याप्रमाणे भावना व्यक्त करा. हिच लोकशाही आहे. माझ्यासह सगळेच बरोबर आहेत”. सुप्रिया यांनी या पोस्टद्वारे हाताला काळी पट्टी बांधल्याचा फोटोही शेअर केला आहे. त्याचबरोबरीने आज होणाऱ्या आयपीएल सामन्यातही क्रिकेटपटू हाताला काळी पट्टी बांधून खेळणार आहेत. तसेच या सामन्यादरम्यान चिअर गर्ल्स नाचणार नसल्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.