‘इट्स मज्जा’ने आपल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी काही दिवसांपूर्वी ‘आठवी-अ’ ही सीरिज भेटीला आणली होती. या सीरिजला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला होता. डोंगरावरच्या एका छोट्याश्या खेडेगावातून हायस्कुलसाठी परगावी येणाऱ्या आभ्या व त्यांच्या खास मित्रांची साधी तरी प्रत्येकाला आपलीशी व हवीहवीशी वाटणारी गोष्ट या सीरिजद्वारे दाखवण्यात आली होती. या सीरिजने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केलं होतं. आभ्या व त्याच्या मित्रांनी प्रेक्षकांना अक्षरश: खिळवून ठेवलं होतं. त्यामुळे या सीरिजच्या प्रत्येक आगामी भागासाठी प्रेक्षक आतुर असायचे. पण अखेर २५ भागांनंतर या सीरिजने प्रेक्षकांचा निरोप घेतला. (Dahavi-A Series Trailer Luanch)
‘आठवी-अ’ ही सीरिज संपल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजीचा सुर पाहायला मिळाला. अनेकांनी ‘आठवी-अ’ ही सीरिज संपल्यामुळे दु:खही व्यक्त केलं होतं. ही सीरिज कधीच संपू नये अशा प्रतिक्रियादेखील त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या होत्या. मात्र या सीरिजच्या निरोपाबरोबरच ‘इट्स मज्जा’ने ‘दहावी-अ’ या सीरिजची घोषणा केली होती. तेव्हापासून अनेकांना ही सीरिज कधी सुरु होणार? याची उत्सुकता लागून राहिली होती आणि आता त्यांची ही उत्सुकता अखेर संपणार आहे. कारण लवकरच ‘दहावी-अ’ ही सीरिज सुरु होणार आहे.
येत्या २६ डिसेंबर रोजी ‘दहावी-अ’ या ‘इट्स मज्जा’च्या आगामी सीरिजचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडणार आहे. येत्या २६ डिसेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता शाहू कलामंदिर येथे ‘दहावी-अ’चा ट्रेलर लाँच सोहळा पार पडणार आहे. गेल्याच महिन्यात ‘दहावी-अ’च्या शूटिंगचा मुहूर्त पार पडला. श्रीगणरायाला वंदन करुन ‘इट्स मज्जा’चे प्रमुख शौरीन दत्ता यांनी मुहूर्ताचा नारळ फोडला आणि ‘दहावी-अ’च्या शूटिंगला सुरवात झाल्याची अधिकृत घोषणा केली होती. तेव्हापासून अनेकजण या सीरिजची आतुरतेने वाट बघत आहेत.
आणखी वाचा – ‘पुष्पा २’ चेंगराचेंगरी प्रकरणातील जखमी मुलगा अजूनही व्हेंटिलेटवर, प्रकृती चिंताजनक, मेंदूला गंभीर इजा
दरम्यान, ‘आठवी-अ’च्या भरघोस यशानंतर आता ‘इट्स मज्जा’ आणि ‘मीडिया वन सोल्यूशन्स’ ‘दहावी-अ’ ही वेबसीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता ‘दहावी-अ’ सीरिजमध्ये प्रेक्षकांना काय नवीन पाहायला मिळणार? या सीरिजमधून आता आणखी कोणती नवीन कथा दिसणार? ही नवीन सीरिज कधी प्रदर्शित होणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळतील.