इट्स मज्जा’च्या नवीन ‘दहावी-अ’ या वेब सीरिजचे आतापर्यंत एकूण पाच भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. पहिल्या भागात सुरुवातीला आभ्या, विक्या, किरण्या व मध्या हे चौघे इंग्रजी विषयाचा अभ्यास करताना पाहायला मिळाले. इंग्रजी विषयावरुन या मित्रांमधली मजामस्ती या सीनमध्ये पाहायला मिळाली. त्यानंतर दुसऱ्या भागात शाळेच्या संस्थेतील एक मुख्य व्यक्ती शाळेच्या पाहणीसाठी येतात आणि तेमुलांची तुकडीनुसार विभागणी करायला सांगतात. तिसऱ्या भागात या मुलांची विभागणी करण्यात आली आहे. यामुळे चिडलेल्या दहावी-अच्या मुलांनी शाळेचे नुकसान केलं आहे. यासाठी त्यांना शाळेची नुकसान भरपाई न करता शाळेत यायचं नाही असं सांगण्यात आलं आहे. (Dahavi-A Series daily updates)
नुकत्याच झालेल्या पाचव्या भागात कांबळे सरांनी मुलांना त्यांच्या शिक्षेची जाणीव करुन दिली असून यात त्यांच्या शाळेचे व अभ्यासाचे नुकसान होणार नाही याची काळजी न करण्याचे आवाहनही मुलांना दिले आहे. यासाठी त्यांनी आभ्या, किरण्या, विक्या या दहावी-अच्या मुलांना शालेआधी एक तास जास्तीचे शिकवणार असल्याचे सांगितले आहे. यासाठी ते कुरकुटे सरांना विनंती करतात. मात्र कुरकुटे सर दहावी-अच्या मुलांसाठी जास्तीचे तास न घेणार असल्याचे सांगतात. यावरून कांबळे व कुरकुटे सर यांच्यात वादही होतात. यावेळी शिंदे सर मुलांना विज्ञान व गणित शिकवणार असल्याचे सांगतात.
त्यानंतर मुलं गावातील एका छोट्या हॉटेलमध्ये काम करत असतात. तेव्हा तुटहे कुरकुटे व शिंदे सर येतात आणि ते मुलांकडे चहा व भजीची मागणी करतात. यावेळी कुरकुटे मुलांना टोमणेदेखील मारतात. तसंच मध्या चुकून कुरकुटे सरांच्या अंगावर चहा सांडतो. त्यामुळे ते वैतागून निघून जातात. पुढे रेश्मा केवडाला मुलांशिवाय शाळेत मन लागत नसल्याचे सांगते. तसंच शाळेत यायची इच्छा नसल्याचेही ती केवडाला सांगते. तेव्हा केवडादेखील तिला धीर देण्याचा प्रयत्न करते. तसंच या मुलांना मदत म्हणून केवडा गाडी धुण्यासाठी जाते. तेव्हा तिला तिची आई बघते आणि याबद्दल ती वडिलांना सांगणार असल्याचे बोलते.
त्यामुळे आता आगामी भागात केवडाला तिची आई नेमकी काय शिक्षा करणार? मित्रांना मदत केल्याप्रकरणी केवडा तिच्या आईची समजूत काढू शकणार का? आणि या मुलांकडून वर्गाची झालेली नुकसान भरपाई निघू शकणार का? या सगळ्यात त्यांच्या दहावीच्या अभ्यासाचं काय होणार? त्यांना वर्गात पुन्हा प्रवेश मिळणार का? हे आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे