सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शाळेच्या नुकसान भरपाईसाठी मुलांची घरकामं, तरीही अभ्या-मध्यासह इतर मुलं ‘ड’ वर्गातच राहणार?, निर्णय बदलणार का?

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 22, 2025 | 5:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Itsmajja original webseries dahavi a daily updates episode 5 madhya abhya house work for compensate for school expenses

नुकसान भरपाई देऊनही दहावी-अच्या मुलांना ड मध्येच राहावं लागणार, पुढे काय होणार? जाणून घ्या...

इट्स मज्जा’च्या नवीन ‘दहावी-अ’ या वेब सीरिजचे आतापर्यंत एकूण पाच भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.  पहिल्या भागात सुरुवातीला आभ्या, विक्या, किरण्या व मध्या हे चौघे इंग्रजी विषयाचा अभ्यास करताना पाहायला मिळाले. इंग्रजी विषयावरुन या मित्रांमधली मजामस्ती या सीनमध्ये पाहायला मिळाली. त्यानंतर दुसऱ्या भागात शाळेच्या संस्थेतील एक मुख्य व्यक्ती शाळेच्या पाहणीसाठी येतात आणि तेमुलांची तुकडीनुसार विभागणी करायला सांगतात. तिसऱ्या भागात या मुलांची विभागणी करण्यात आली आहे. यामुळे चिडलेल्या दहावी-अच्या मुलांनी शाळेचे नुकसान केलं आहे. यासाठी त्यांना शाळेची नुकसान भरपाई न करता शाळेत यायचं नाही असं सांगण्यात आलं आहे. (Dahavi-A Series daily updates)

नुकत्याच झालेल्या पाचव्या भागात कांबळे सरांनी मुलांना त्यांच्या शिक्षेची जाणीव करुन दिली असून यात त्यांच्या शाळेचे व अभ्यासाचे नुकसान होणार नाही याची काळजी न करण्याचे आवाहनही मुलांना दिले आहे. यासाठी त्यांनी आभ्या, किरण्या, विक्या या दहावी-अच्या मुलांना शालेआधी एक तास जास्तीचे शिकवणार असल्याचे सांगितले आहे. यासाठी ते कुरकुटे सरांना विनंती करतात. मात्र कुरकुटे सर दहावी-अच्या मुलांसाठी जास्तीचे तास न घेणार असल्याचे सांगतात. यावरून कांबळे व कुरकुटे सर यांच्यात वादही होतात. यावेळी शिंदे सर मुलांना विज्ञान व गणित शिकवणार असल्याचे सांगतात.

आणखी वाचा – चक्क सीएनेच दिव्यांका त्रिपाठीला १२ लाख रुपयांना फसवलं, टॅक्सच्या नावाखाली फॉर्मवर सही घेतली अन्…; सांगितली संपूर्ण घटना

त्यानंतर मुलं गावातील एका छोट्या हॉटेलमध्ये काम करत असतात. तेव्हा तुटहे कुरकुटे व शिंदे सर येतात आणि ते मुलांकडे चहा व भजीची मागणी करतात. यावेळी कुरकुटे मुलांना टोमणेदेखील मारतात. तसंच मध्या चुकून कुरकुटे सरांच्या अंगावर चहा सांडतो. त्यामुळे ते वैतागून निघून जातात. पुढे रेश्मा केवडाला मुलांशिवाय शाळेत मन लागत नसल्याचे सांगते. तसंच शाळेत यायची इच्छा नसल्याचेही ती केवडाला सांगते. तेव्हा केवडादेखील तिला धीर देण्याचा प्रयत्न करते. तसंच या मुलांना मदत म्हणून केवडा गाडी धुण्यासाठी जाते. तेव्हा तिला तिची आई बघते आणि याबद्दल ती वडिलांना सांगणार असल्याचे बोलते.

आणखी वाचा – सैफ अली खानच्या सुरक्षिततेमध्ये वाढ, सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या सुरक्षा एजन्सीकडे दिली जबाबदारी, काही महिने घरीच राहणार

त्यामुळे आता आगामी भागात केवडाला तिची आई नेमकी काय शिक्षा करणार? मित्रांना मदत केल्याप्रकरणी केवडा तिच्या आईची समजूत काढू शकणार का? आणि या मुलांकडून वर्गाची झालेली नुकसान भरपाई निघू शकणार का? या सगळ्यात त्यांच्या दहावीच्या अभ्यासाचं काय होणार? त्यांना वर्गात पुन्हा प्रवेश मिळणार का? हे आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे      

Tags: dahavi A episodeDahavi-A Series daily updatesDahavi-A Series News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
vicky kaushal and rashmika mandana upcoming most awaited chhaava movie trailer

Chhaava Trailer : "हर हर महादेव"; विकी कौशलच्या ऐतिहासिक 'छावा'चा अंगावर काटा आणणारा ट्रेलर, दमदार डायलॉग, अ‍ॅक्शन अन् अवाढव्य सेट

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.