‘दहावी अ’ वेबसीरिजची सध्या सगळीकडे हवा आहे. ITSMAJJA च्या या वेबसीरिजला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. गेले दहा दिवस ‘दहावी अ’चे कलाकार मुंबई दौऱ्यावर होते. यादरम्यान त्यांनी स्वप्नाच्या नगरीतील अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली. शिवाय या दौऱ्यानिमित्त त्यांची अनेक स्वप्न पूर्ण सत्यात उतरले. त्यातील काही क्षण अगदी कायम लक्षात ठेवण्यासारखे आहेत. मुंबई इंडियन्सबरोबर लाइव्ह शो, वानखेडे स्टेडियमवर जाऊन मॅचचा आनंद, गुगल ऑफिसला भेट अशी अनेक स्वप्न मुलांची पूर्ण झाली. अशातच आता ‘दहावी अ’च्या कलाकारांना सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री छाया कदम यांना भेटण्याची संधी मिळाली. यावेळी ‘दहावी अ’ची टीम व छाया यांच्यामध्ये धमाल गप्पा रंगल्या. (Dahavi a actors meet actress chhaya kadam)
‘दहावी अ’च्या कलाकारांनी छाया यांच्याबरोबर बसून एकत्र जेवण केलं. विविध पदार्थांचा आस्वाद घेतला. त्याचबरोबरीने छाया यांच्याकडून कलाकारांना नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. यावेळी संयोगिता, ओम, रुद्र, अथर्व, सृष्टी, विनित, सत्यजीत, श्रेयस यांनी छाया यांना चित्रपटसृष्टीविषयी विविध प्रश्न विचारले. त्यांचे अनुभव सांगितले. तसेच छाीविषयी विविध प्रश्न विचारले. कतया यांच्या कामाविषयीही कलाकारांनी जाणून घेतलं. कलाकारांसाठी हा अनुभव आयुष्यभराची शिकवण देणारा होता.
छाया यांनीही मुलांना माहितीपूर्ण मार्गदर्शन केलं. कितीही यश मिळालं तरी जमीनीवरच पाय असले पाहिजे हे अधोरेखित करत सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे ‘दहावी अ’चे कलाकार हे साताऱ्यातील विविध भागांमध्ये राहतात. त्यांची बोलण्याची पद्धत, भाषा अगदी सातारी आहे. त्यांनी त्यांच्या भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे हे छाया यांनी सांगितलं. तसेच स्वतःची भाषा बोलणं सोडू नका असंही त्यांनी कलाकारांना सांगितलं.
आणखी वाचा – “माझे स्तन तिच्याएवढे नाहीत आणि…”, नीना गुप्तांची सुप्रसिद्ध अभिनेत्रीबाबात धक्कादायक वक्तव्य, त्यांनी थेट…
बऱ्याचदा मराठी किंवा गावाकडील भाषेमध्ये बोलणं मुलं टाळतात. पण गावाकडील भाषा येणं हेच तुमचं मोठं कौशल्य आहे हे छाया यांनी ‘दहावी अ’च्या कलाकारांना पटवून दिलं. छाया यांनी त्यांच्या जुन्या दिवसांबाबत कलाकारांना सांगितलं. कुटुंबातून पाठिंबा नसतानाही कसं काम केलं?, आज त्यांना कशाप्रकारे यश मिळालं? हेही सांगितलं. शिवाय साताऱ्यामध्ये येण्याची इच्छाही बोलून दाखवली. ‘दहावी अ’चे कलाकारही छाया यांना भेटून अगदी खूश झाले.