बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मध्या, आभ्या, विक्या, किरण्या शाळेत पुन्हा परतले, पण रेश्मा व केवडामध्ये गैरसमज, काय असेल नेमकं कारण?

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 27, 2025 | 12:21 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Dahavi-A series daily updates

मध्या, आभ्या, विक्या, किरण्या शाळेत पुन्हा परतले, पण रेश्मा व केवडामध्ये गैरसमज, काय असेल नेमकं कारण?

Dahavi-A series daily updates : इट्स मज्जा’च्या नवीन ‘दहावी-अ’ या वेब सीरिजला आतापर्यंत भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या लोकप्रिय सीरिजचे एकूण सहा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ‘दहावी-अ’ मधून ‘दहावी-ड’ मध्ये जाण्याचा निर्णय आभ्या, किरण्या, मध्या, विक्या यांना पटला नाही. त्यामुळे त्यांनी चिडून शाळेतील वस्तूंचं नुकसान केलं. नुकसानभरपाई केल्याशिवाय शाळेत येता येणार नाही असा निर्णय शाळेकडून देण्यात आल्यामुळे आता नुकसानभरपाई करुनच शाळेत जायचं असं मुलांनी ठरवलं.

गेल्या भागात मध्या, आभ्या, विक्या व किरण्या यांनी जमेल ते काम करत पैसे जमा केले आणि नुकसान केलेल्या सर्व वस्तू शाळेत आणल्या. मात्र त्यांना शाळेतील तक्त्यांसाठी पैसे कमी पडत होते. त्यामुळे त्यांनी ते तक्ते न घेता इतर सामान न शाळेत नेले. यावेळी त्यांचे कौतुक म्हणून जंगम सरांनी त्यांचे तक्त्याचे पैसे माफ केले आणि तक्ते दिले. तसेच यावेळी त्यांनी सर्व मुलांचे कौतुकही केलं.

आणखी वाचा – जेवण भरवलं, पायांना मसाज केला अन्…; कर्करोगाच्या उपचारादरम्यान हिना खानची बॉयफ्रेंडसाठी भावुक पोस्ट, म्हणाली, “हे सोपे नव्हते…”

यानंतर छोटासा कार्यक्रम करत शिक्षकांनी या मुलांचं शाळेत पुन्हा एकदा स्वागत केलं. यावेळी मध्याने बाहेर काम करताना काय कष्ट करावे लागतात?, बाहेर कष्ट करण्यापेक्षा शाळेत अभ्यास करणे केव्हाही चांगलं याची जाणीव झाल्याचेही तो म्हणतो. तसंच पुढे आभ्यादेखील आमच्याकडून रागाच्या भरात झालेली चूक आम्हाला समजली आहे आणि पुन्हा ही चूक कधीच होणार नाही असं म्हणतो. तसेच पुढे तो जंगम सरांना आम्हाला पुन्हा एकदा ‘आठवी-अ’मध्येच बसवण्याची विनंतीही करतो.

आणखी वाचा – Video : आई झाल्यानंतर पहिल्यांदाच रॅम्प वॉक करताना दिसली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीची रेखाशी होतेय तुलना, चाहत्यांकडून कौतुक

त्यामुळे गेले १५ दिवस शाळेतून बाहेर असणारी ही मुलं अखेर शाळेत पुन्हा आले आहेत. तसंच ही मुलं पुन्हा एकदा ‘दहावी-अ’ मध्येही आले आहेत. त्यामुळे आता पुन्हा या मुलांबद्दल शाळा काय निर्णय घेणार हे? आगामी भागात पाहायला मिळणार आहे. शिवाय आगामी भागात रेश्मा व केवडा यांच्यात गैरसमजही होणार आहेत. हा गैरसमज नेमका काय असेल? हे पुढील भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

Tags: Dahavi-A Series daily updatesDahavi-A Series daily updates Marathi NewsItsmajja Dahavi-A Series
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Nivedita  Saraf

"हा एकट्या अशोकचा सन्मान नाही", अशोक सराफ यांना पद्मश्री जाहीर होताच पत्नी निवेदिता सराफ झाल्या व्यक्त, म्हणाल्या, "त्यांना कामापुढे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.