new marathi webseries : सध्या सिनेसृष्टीत वेबसीरिज या माध्यमाला अधिक प्राधान्य मिळालेलं पाहायला मिळत आहे. बरीच कलाकार मंडळी ही वेबसीरिजकडे वळलेली दिसतात. अशातच एका वेबसीरिजने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातलेला पाहायला मिळाला. कोणताही ओळखीचा चेहरा न घेता केवळ कथानकाच्या आणि नवोदित कलाकारांच्या जोरावर या वेबसीरिजने प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. ही वेबसीरिज म्हणजेच ‘दहावी अ’. ‘इट्स मज्जा’ ओरिजनलच्या ‘दहावी अ’ बरोबरच ‘आठवी अ’, ‘मैत्रीचा सातबारा’, ‘पाऊस’, ‘पाऊस २’ या वेबसीरिजचीही चर्चा रंगलेली पाहायला मिळाली.
यानंतर आता ‘इट्स मज्जा’ ओरिजनल प्रस्तुत आणखी एक वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीस आणण्यास सज्ज झाली आहे. त्यांनी या नव्या वेबसीरिजचे नाव सांगत मुहूर्तही केलेला पाहायला मिळत आहे. कोकणात या मालिकेचं चित्रीकरण सुरु होणार असून या नव्या सिरीजच्या मुहूर्ताची झलक समोर आली आहे. यावेळी वेबसीरिजमध्ये कोणते कलाकार झळकणार हे समोर आलेलं नसलं तरी सीरिजच नाव समोर आलं आहे. कोकणात शूट होणाऱ्या या नव्या वेबसीरिजच नाव ‘साकव’ असं आहे.
साकव म्हणजे जोडणारा दुवा आहे. आता या नव्या वेबसीरिजमध्ये हा साकव कोकणच्या उबदार मातीला आणि नात्यांना जोडण्यासाठी सज्ज झाला आहे. सौरिंद्र नाथ दत्ता आणि ‘मीडिया वन सोल्युशन्स’ निर्मित साकव ही वेबसीरिज असणार आहे. या साकव वेबसीरिजच्या प्रोजेक्ट आणि क्रिएटिव्ह हेडची जबाबदारी अंकिता अशोक प्रतिभा लोखंडे यांनी सांभाळली आहे. तर दिग्दर्शनाची धुरा नितीन वाडेवाले यांनी उचलली आहे. तर साकव या वेबसीरिजच लेखन नितीन पवार यांचे आहे.





