भारतातील श्रीमंत उद्योगपतींपैकी एक म्हणजे मुकेश अंबानी. सध्या अंबानी कुटुंब खूप चर्चेत आले आहे. जुलै महिन्यात त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिक मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. याआधी मार्च महिन्यात प्री-वेडिंग सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी तब्बल १६०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असल्याचे समोर आले आहे. अशातच आता दुसऱ्यांदा प्री-वेडिंग सोहळ्याचे आयोजन केले असून हा सोहळा २९ मे ते १ जून रोजी इटली ते फ्रांस दरम्यान एका अलिशान क्रूझवर पार पडणार आहे. या क्रूझवर जगभरातील सर्व सुख सुविधा आहेत. (ambani childrens education and networth)
परंतु पाण्यासारखा खर्च करणारे अंबानी कुटुंबातील मुलांचे शिक्षण आणि उत्पन्न किती आहे? याबद्दल सगळ्यांना जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्याबद्दल आपण माहिती घेऊया. मुकेश यांना ईशा, अनंत व आकाश अशी तीन मुलं आहेत. तिघांनी शिक्षण कुठे घेतले आणि सध्या ते किती कमावतात याबद्दल जाणून घेऊया. ईशाचा जन्म २३ ऑक्टोबर १९९१ साली मुंबईमध्ये झाला. तिने स्टॅनफोर्ड येथे MBA केले आहे. व्यावसाईक आनंद पिरामलबरोबर ती २०१८ साली लग्नबंधनात अडकली. लग्नाच्या तीन वर्षाआधीच तिने वडिलांच्या जिओ कंपनीमध्ये डायरेक्टरची पोस्ट घेऊन काम सुरु केलं. लग्नानंतरही ईशाने काम तसच सुरु ठेवलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईशा अंबानी ८३५ कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे.
ईशा व आकाश हे दोघेही जुळी भावंडं आहेत. आकाशचा जन्मदेखील २३ ऑक्टोबर १९९१ रोजी झाला. आकाशने सुरुवातीचे शिक्षण धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये घेतले. त्यानंतर त्याने ब्राऊन युनिव्हर्सिटीमधून उच्च शिक्षण घेतले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आकाश ४ हजार कोटी रुपये संपत्तीचा मालक आहे.
अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत. अनंतने उच्चशिक्षण ब्राऊन युनिव्हर्सिटीमध्ये घेतले. त्याने नंतर वडिलांबरोबर बिजनेस सांभाळण्यास सुरवात केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आकाशची संपत्ती ३.३ लाख कोटी रुपये आहे.