देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा विवाह सोहळा लवकरच पार पडणार आहे. उद्योगपती विरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंटबरोबर तो लग्न करणार आहे. गेल्या वर्षी दोघांचाही साखरपुडा पार पडला. हे वर्ष सुरु झाल्यानंतर दोघांच्याही लग्नाची चर्चा सुरु झाली. फेब्रुवारी माहिन्यात दोघांच्या प्री-वेडिंग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी जगभरातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. त्यानंतर एप्रिलमध्ये देखील दुसऱ्यांदा प्रीवेडिंग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा क्रूझवर आयोजित करण्यात आले होते. (mukesh ambani and nita ambani dance performance)
प्री-वेडिंगच्या दोन्ही सोहळ्याला बॉलीवूडमधील सर्व कलाकारांनी उपस्थिती दर्शवली होती. आता १२ जुलै रोजी अनंत व राधिकाचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. याआधी विवाहाच्या आधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. ५ जुलै रोजी त्यांचा संगीत सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये बॉलीवूडमधील अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली होती. तसेच सलमान खानसहित अनेकांनी आपले स्पेशल परफॉर्मन्स दिले आहेत. मात्र यामध्ये खुद्द मुकेश अंबानी व नीता अंबानी यांचा डान्स सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे.
अनंत व राधिकाच्या या संगीत सोहळ्यामध्ये मुकेश व नीता यांनी नातवंडांसमवेत डान्स केला आहे. एका कारमध्ये ते बसलेले दिसत असून मोहम्मद रफी यांच्या गाण्यावर परफॉर्म केले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झाले आहेत. या व्हिडीओमध्ये ते जुनी गाडी चालवताना दिसत आहेत. तसेच त्यांच्याबरोबर पृथ्वी, आदिया, कृष्णा व वेद त्या गाडीमध्ये असून ‘चक्के पे चक्का’ या गाण्यावर लिप सिंक करताना दिसत आहेत.
याबरोबरच संपूर्ण कुटुंबाचा परफॉर्म करतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये संपूर्ण अंबानी कुटुंब शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटाच्या टायटल ट्रॅकवर डान्स करताना दिसत आहेत. यामध्ये सुरुवातीला मुकेश व नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश व जावई आनंद पिरामल दिसून येतात. त्यानंतर मुलगी ईशा व सून श्लोका येतात त्यानंतर मुकेश व नीता हे स्टेजवर दिसतात. तसेच शेवटी अनंत व राधिका येतात व सगळे सुंदर डान्स सादर करतात.