‘इंडियन आयडल १२’ शोचा विजेता पवनदीप राजन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच पवनदीपचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये त्याची झालेली अवस्था पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली. अपघातामधील त्याचे बरेच फोटो व्हायरल झाले. यामध्ये त्याच्या गाडीचं झालेलं नुकसान पाहता अपघाताची तीव्रता लक्षात आली. शिवाय पवनदीपलाही मोठी दुखापत झाली. लगेचच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र गंभीर परिस्थिती पाहता पवनदीपला दिल्लीमधील रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे तब्बल सहा तास त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. पुन्हा दोन दिवसांनी फ्रॅक्चर झालेल्या ठिकाणी शस्त्रक्रिया करण्याचा डॉक्टरांनी निर्णय घेतला. आता त्याचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. (Pawandeep Rajan Health Update)
पवनदीपबाबत अनेक चाहते चिंता व्यक्त करत होते. अपघातानंतर त्याला समोरच्याला ओळखणंही कठीण झालं होतं. मात्र ता त्याच्याबाबत एक दिलासादायक बाब समोर आली आहे. पवनदीपची तब्येत हळूहळू सुधारत आहे. त्याचा रुग्णालयातील व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये तो रुग्णालयाची बेडवर बसून गाणं गाताना दिसत आहे. हे दृश्य पाहून चाहत्यांना आनंदाचा धक्का बसला. तसेच लवकर बरं व्हावं म्हणून अनेकांनी पवनदीपसाठी प्रार्थना केली.
आणखी वाचा – कार्तिकी गायकवाडच्या लेकाचा पहिला वाढदिवस, सुंदर फोटोशूट करत दाखवला चेहरा, नाव आहे…
पाहा व्हिडीओ
या व्हिडीओमध्ये पवनदीप ‘जो भेजी थी दुवां’ गाणं गाताना दिसत आहे. यामध्ये त्याचा हात फ्रॅक्चर झालेला दिसत आहे. पण अगदी मनापासून तो हे गाणं गाताना दिसत आहे. गाणं गाताना पवनदीपच्या चेहऱ्यावर असलेल्या आनंद अगदी पाहण्यासारखा आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. तू लवकर बरा हो, तुला असं गाणं गाताना बघून खूप आनंद होत आहे, तुला कोणाचीच नजर लागू नये अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
आणखी वाचा – मालिकांमधील सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री होणार आई, बेबी बंप दाखवत शेअर केले फोटो, सुंदर लूकने वेधलं लक्ष
५ मेला पवनदीपचा मोठा अपघात झाला. या अपघाताची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. ड्रायव्हर गाडी चालवत असताना त्याला डुलकी लागली. याचाच परिणाम म्हणून पवनदीपची गाडी एका ट्रकला धडकली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. एका कार्यक्रमाला जाण्यासाठी तो दिल्ली विमानतळाकडे निघाला होता. मात्र त्याचपूर्वी ही घटना घडली. खरंतर पवनदीप मृत्यूच्या दारातून परतला आहे.