भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या सध्या खूप चर्चेत आले. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. याचवेळी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिला. हार्दिक व त्याची पत्नी नताशा स्टॅन्कोव्हीक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या होत्या. मात्र त्यावर हार्दिक व नताशा यांनी कोणत्याही प्रकारची कबुली दिली नव्हती. पण आयपीएल सामन्यादरम्यन आणि विश्वचषकादरम्यान नताशा हार्दिकला पाठिंबा देण्यासाठी एकाही सामन्याला हजर नव्हती. त्यामुळे घटस्फोटाच्या चर्चा अधिक रंगल्या. अशातच आता हार्दिकबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे. (hardik pandya mystery girl)
हार्दिक व नताशा यांचे संबंध बिघडले असल्याचे बोलले जात आहे. हार्दिक जेव्हा विश्वचषक जिंकून आला तेव्हा नताशा त्याला भेटण्यासाठी आली नाही. तसेच तिने सोशल मीडियावरही त्याला अभिनंदन करण्यासाठी कोणतीही पोस्ट केली नव्हती. त्यामुळे चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली. अशातच हार्दिकचा एक नवीन फोटो समोर आल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये हार्दिक एका मुलीबरोबर असलेला दिसून येत आहे. समोर आलेल्या फोटोमध्ये असणाऱ्या मुलीचे नाव प्राची सोलंकी असल्याचे समजत आहे. फोटोमध्ये प्राचीच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य पाहायला मिळत आहे. प्राचीने केवळ हार्दिकबरोबरच नाही तर त्याच्या कुटुंबाबरोबरही फोटोंमध्ये दिसून येत आहे. या फोटोंमध्ये हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्यादेखील दिसून येत आहे.
बायको व लेक घरीच, आई व बहिणीसह काशी विश्वनाथला पोहोचला अभिषेक बच्चन, वाद की आणखी काही?
समोर आलेल्या फोटोमध्ये हार्दिकने फिकट पांढऱ्या रंगाचा आणि त्यावर सोनेरी रंगाची नक्षी असलेला कुर्ता परिधान केलेला पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत प्राचीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “कोणी मला चिमटा काढेल का?धन्यवाद हार्दिक पांड्या”. प्राचीने शेअर केलेल्या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले की, “नताशापेक्षा ही चांगली आहे”, तसेच दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “भाभी २”, अजून एकाने लिहिले की, हार्दिक प्लीज. हीला अगस्त्यची नवीन आई बनवा”. तसेच पुन्हा एकाने लिहिले की, “लग्न कर हिच्याबरोबर”.
दरम्यान आता हार्दिकबरोबर या फोटोमध्ये असणारी ही मुलगी नक्की कोण आहे? याबद्दल मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. नताशानेदेखील काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर येत असं काहीही नसल्याचं सांगितलं होतं. मात्र यात काहीही तथ्य नसल्याचे ती म्हणाली होती. पण आता हार्दिकच्या फोटोंमुळे नवीन चर्चा सुरु झाल्या आहेत.