भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या हा सतत चर्चेत असतो. आयपीएल सुरु झाल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या कारणामुळे त्याला अनेक समस्यांचा व चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम त्याच्या खेळावर झालेला पाहायला मिळाला. तो या वर्षी आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करु शकला नाही. पाच वेळा चॅम्पियन असणारा मुंबई इंडियन्सचा संघ यावेळी सर्वात खालच्या स्तरावर असलेला पाहायला मिळाला. परंतु आता तो त्याच्या व्यावसायिक आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. (hardik pandya and Natasha stankovic relation)
मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिक व त्याची पत्नी नताशा स्टेनकोविक यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचे समोर आले आहे. कदाचित दोघेही एकमेकांबरोबर घटस्फोट घेऊ शकतात असेही वृत्त हाती येत आहे. गेल्या काही दिवसांपासून नताशा खूप चर्चेत आहे. आयपीएल मॅचच्या दरम्यान नताशाला ऑनलाइन धमकावण्यातदेखील आले होते. त्यामुळे तिच्याबद्दल अधिक चर्चा रंगली होती. परंतु आता हार्दिक व नताशा यांच्यामध्ये दुरावा आल्याचे समोर आले असून त्याबद्दल सर्वत्र चर्चा होत असलेली दिसून आली.
रेडिटवर व्हायरल झालेल्या पोस्टनुसार, “हा केवळ एक अंदाज आहे. पण हार्दिक व नताशा दोघेही एकमेकांच्या स्टोरीवर रिपोस्ट करत नाहीत. याआधी नताशाच्या इन्स्टाग्रामवर नताशा स्टेनकोविक पांड्या लिहिले होते. पण आता नताशा आडनाव हटवले आहे”.
पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, “हार्दिकचा ४ तारखेला वाढदिवस होता. पण नताशाने त्याच्यासाठी कोणतीही पोस्ट केली नाही. तसेच तिने सोशल मीडियावरुन हार्दिकबरोबरचे काही फोटोदेखील डिलिट केले आहेत. तसेच आयपीएल दरम्यानेही नताशाने कोणतीही पोस्ट शेअर केली नव्हती. त्यामुळे दोघांमध्ये काहीही ठीक नसल्याचा अंदाज सगळ्यांनी व्यक्त केला आहे”.
या पोस्टवर हार्दिकच्या चाहत्यांनीही काही प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले आहे की, “यामध्ये आश्चर्य करण्यासारखे काहीच नाही”, “दोघांच्याही नात्यावर सध्या काहीही बोलणे चुकीचे ठरेल. पण हार्दिकने अजून फोटो डिलिट केले नाहीत. त्यामुळे कोणतेही निष्कर्ष काढणे चुकीचे आहे”. तसेच अजून एकाने लिहिले की, “आयपीएलमध्ये हार्दिकवर लोकांचा खूप राग होता. त्यामुळे कदाचित सतर्क राहण्यासाठी नताशाने हे पाऊल उचलले आहे. देशात क्रिकेटपटूंच्या पत्नीना धमकावले जाते. त्रास दिला जातो. याआधी देखील खराब कामगिरी केल्यामुळे महेंद्रसिंह धोनीच्या पाच वर्षाच्या मुलीलादेखील त्रास दिला गेला होता”.
पण आता हार्दिक व नताशा यांच्या नात्यामध्ये खरच दुरावा आला आहे का? दोघं घटस्फोट घेणार का? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाले आहेत.