नुकताच भारतीय संघ विश्वविजेता झाल्याने आजही भारतामध्ये जल्लोष साजरा करताना दिसत आहेत. संपूर्ण देशभरातून रोहित शर्मा, हार्दिक पांड्या व सगळ्या संघाचे कौतुक होत आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीदेखील त्यांना घरी बोलवून कौतुक केले. त्यानंतर बीसीसीआयने वानखेडे मैदानात सगळ्या खेळाडूंसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. महाराष्ट्र सरकारनेदेखील खेळाडूंच्या सन्मानासाठी बक्षीसची घोषणा केली होती. आता अंबानी कुटुंबाने भारतीय कर्णधार रोहित शर्मा, हार्दिक पांड्या व सूर्यकुमार यादव तसेच सगळ्या संघाचे विशेष कौतुक केले. (rohit sharma and nita ambani viral video)
सध्या अंबानींच्या घरी अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाची गडबड सुरु आहे. कुटुंबाने अनंत व राधिकाच्या संगीत सोहळ्यात भारतीय संघाला मिळालेल्या ट्रॉफीचा आनंद साजरा केला आहे. याबाबत मुंबई इंडियंसने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नीता अंबानी भारतीय संघाचा कर्णधार रोहितची पत्नी रितिका सजदेहचा हात पकडून पूजेसाठी जाताना दिसली. त्यानंतर हार्दिक, रोहित व सूर्यकुमार यादव यांच्याबरोबर पूजा करतानाही दिसल्या.
“𝙏𝙤𝙪𝙜𝙝 𝙏𝙞𝙢𝙚𝙨 𝘿𝙤𝙣'𝙩 𝙇𝙖𝙨𝙩, 𝙏𝙤𝙪𝙜𝙝 𝙋𝙚𝙤𝙥𝙡𝙚 𝘿𝙤"👏
— Mumbai Indians (@mipaltan) July 6, 2024
Mrs. Nita Ambani summed up Team India's brilliant campaign as they stood against the odds in the #T20WorldCup and emerged as the undisputed champions. 🏆🇮🇳#MumbaiIndians pic.twitter.com/uPibPmWTGK
दरम्यान यावेळी नीता या खूप भावूक झालेल्या दिसल्या. त्यांनी रोहित, हार्दिक व सूर्यकुमार यांना मंचावर बोलावले. त्यांनी रोहित ला मिठीदेखील मारली आणि केलेल्या कामगिरीचे कौतुकदेखील केले आणि भारताला विश्वचषक मिळवून दिल्याबद्दल आभारदेखील मानले. त्यानंतर भारताचा तिरंगा हातात घेऊन डान्स करुन जल्लोष केला.
दरम्यान विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघ भारतात येतात त्यांचे जंगी स्वागत केले गेले. जिंकलेली ट्रॉफी मुंबईमध्ये फिरवण्यात आली. भारतीय संघाला बघण्यासाठी मुंबईतील मरीन ड्राइव्हवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली दिसून आली होती. संपूर्ण मरीन लाईन्सवरील नजाऱ्याने जगातील सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. अशातच त्यांचे आता अंबानी कुटुंबाकडूनही कौतुक करण्यात आले. त्यांच्या झालेल्या कौतुकाने सगळ्यांचेच डोळे पाणावले होते.