बॉलिवूड अभिनेता आमिर खानची निर्मिती असणारा चित्रपट ‘लापता लेडीज’ हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी हा चित्रपट ऑस्करमध्ये जाणार असल्याच्या खूप चर्चा रंगल्या होत्या. ‘‘अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ने बुधवारी १८ डिसेंबर रोजी ऑस्कर २०२५ च्या शर्यतीतील चित्रपटांची यादी जाहीर केली. या यादीत १० विविध श्रेणींमध्ये नामांकन मिळाले होते. मात्र आता समोर आलेल्या यादीने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. किरण राव दिग्दर्शित हा चित्रपट ऑस्कर पुरस्कार २०२५ मधून बाहेर पडला आहे. याबरोबरच पायल कपाडियाच्या ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटाची भारतातून निवड झाली. मात्र हा चित्रपटही या शर्यतीतून बाहेर पडला. (ricky kej on laapataa ladies)
अशातच आता भारतीय-अमेरिकन संगीतकार रिकी केजने यावर भाष्य केले आहे. त्याने सोशल मीडियावर याबद्दल एक पोस्ट केली असून ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या रिकी केजने एक्स अकाऊंटवर ‘लापता लेडीज’चे पोस्टर शेअर करत लिहिले की, “अकादमीची यादी समोर आली आहे. ‘लापता लेडीज’ खूप चांगल्या प्रकारे तयार केला आहे. चित्रपट खूप मनोरंजक आहे(मला आवडला). पण इंटरनॅशनल फीचर फिल्मच्या चांगल्या श्रेणीसाथी भारताचे प्रतिनिधित्व करण्याच्या हिशोबाने या चित्रपटाची निवड चुकीची होती”.
So, the @TheAcademy Oscars shortlist is out. #LaapataaLadies is a very well made, entertaining movie (I enjoyed it), but was absolutely the wrong choice to represent India for the best #InternationalFeatureFilm category. As expected, it lost.
— Ricky Kej (@rickykej) December 18, 2024
When are we going to realize.. year… pic.twitter.com/iWGpSXY1KD
पुढे त्याने लिहिले की, “आपण केवळ आशा चित्रपटांची निवड करावी जे कलेशी तडजोड करत नाहीत. चित्रपटाचे कमी असो किंवा जास्त असो, चित्रपटात मोठा कलाकार असो किंवा नसो. यामध्ये कला दिसणे महत्त्वाचे आहे. चित्रपटाचे पोस्टर बघूनच अकादमीच्या अधिक सदस्यांनी नाकारले होते”. दरम्यान रिकीची ही पोस्ट आता चांगलीची चर्चेत आली आहे. रिकीच्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियादेखील मिळत आहेत.
‘लापता लेडीज’चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर आमिरच्या प्रोडक्शन हाऊसकडून एक पत्र जारी करण्यात आले आहे. यामध्ये लिहिले आहे की, “या वर्षी अकादमी पुरस्कार सोहळ्यात निवड होऊ शकली नाही. याबद्दल आम्हाला खेद आहे. याबरोबरच या प्रवासात सगळ्यांचे आशीर्वाद आणि पाठिंबा मिळाला आहे त्याबद्दल खूप आभारी आहोत. आमिर खान प्रोडक्शन जिओ स्टुडिओ व काइंडलिंक प्रोडक्शन टीमकडून अकादमी सदस्य व FFI ज्यूरी यांचे आभार मानत आहे. मोठ्या चित्रपटांच्या यादीमध्ये आम्हाला स्थान दिल्याबद्दल धन्यवाद. निवडल्या गेलेल्या १५ चित्रपटाच्या टीमला खूप शुभेच्छा. या प्रवासाचा भाग बनवल्याबद्दल धन्यवाद”. हे पत्रदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे”.