India Won Icc Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी २०२५ च्या विजेतेपदावर भारताने नाव कोरले. भारताने ही स्पर्धा तब्बल १२ वर्षानी जिंकली आणि न्यूझीलंडचा २५ वर्ष जुना बदला पूर्ण केला. हा विजयाचा आनंद सर्वत्र ओसंडून वाहताना पाहायला मिळाला. भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हा विजय जल्लोषात सुरु असलेला दिसला. तर हिटमॅन रोहित शर्मावर कौतुकाचा वर्षाव होताना पाहायला मिळाला. यंदाच्या या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कारही रोहित शर्माला मिळाला. मात्र स्पर्धेच्या मध्यंतरीच्या काळात रोहितला बरंच ट्रोल केलेलं पाहायला मिळालं. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता रोहितने दर्जेदार परफॉर्मन्स देत प्रेक्षकांची मन जिंकली आणि भारताचा झेंडाही उंचावला.
यंदा ट्रॉफी भारतातच यावी यासाठी प्रत्येकजण प्रार्थना करताना दिसला. बॉलिवूड कलाकारच नव्हे तर मराठी कलाकारांनीही हा सामना पाहण्यासाठी दुबई गाठले. तर काहींनी या अभूतपूर्व यशानंतर सोशल मीडियावर आनंद व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये या कलाकारांनी रोहितच्या खेळाचं तोंडभरून कौतुक केलेलं पाहायला मिळालं. इतकंच नव्हे तर रोहितला वजनावरुन ट्रोल करणाऱ्यांची बोलती बंद केलेली दिसली.
आणखी वाचा – स्पेशल परफॉर्मन्स, औक्षण अन्…; ‘स्टार प्रवाह’ पुरस्कार सोहळ्यात अशोक सराफ यांचा विशेष सन्मान, पत्नी भावुक

‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेता अभिजीत केळकर याने इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत त्यावर ‘होळीच्या आधीच दिवाळी’ असं म्हणत भारतीय क्रिकेट संघाचं कौतुक केलं. तर अभिनेते सलील कुलकर्णी यांनी भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन रोहित शर्मासाठी खास पोस्ट शेअर करत लिहिले की, “हिटमॅनला अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच मिळालं आहे त्यामुळे आता त्याला ट्रोल करणारे निघून जाऊ शकतात”. तर सुप्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेणे congratulations boys, so proud of u असं म्हणत अभिमान व्यक्त केला.
“पोरं राजासारखी जिंकली. न्युझीलंडचा नाक दोनदा फोडलं याचा विशेष आनंद. यंदा किवी पिळायलाच हवा होता”, असं म्हणत अभिनेते स्वप्निल राजशेकर यांनीही आनंद व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी रोहितला राजकीय नेत्याकडून वजन कमी करण्याचा सल्ला मिळाला तेव्हापासून हा वाद चिघळत गेला. तर कालच्या मॅचमध्ये रोहित टॉस हरताच मिम्सचा पाऊस पडू लागला.