महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. शोच्या कलाकारांनी संपुर्ण महाराष्ट्राला खळखळवून हसवलंय. या शोमधील कलाकारांच्या योग्यवेळी मारलेल्या पंचमुळे शोचा प्रेक्षक वर्ग प्रचंड वाढलाय. म्हणून या कार्यक्रमाच्या कलाकारांवर प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम आहे. (Shivali Parab photoshoot )

हे देखील वाचा: ‘सई ताम्हणकरला टक्कर देते तु..’ प्राजक्ताच्या फोटोशूटवर चाहत्याची कमेंट
या कार्यक्रमातील कलाकार सोशल मिडीयावर नेहमी सक्रिय असतात. या कार्यक्रमातील विनोदी अभिनेत्री शिवाली परब तिच्या फोटोंच्या पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. शिवाली हिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.
शिवलीचा हॉट आणि ब्युटीफुल लुक
शिवलीने शेअर केलेल्या फोटोत तिने पिवळ्या रंगाचा आऊटफिट घातला असून यात शिवली हॉट आणि ब्युटीफुल दिसतीये.

महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात प्रेक्षकांना नटखट अंदाजात दिसत असणारी शिवाली, प्रेक्षकांना अशा बोल्ड अंदाजात देखील पाहायला आवडते. म्हणूनच तिच्या या फोटोंवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

या फोटोंवर शिवालीच्या एका चाहत्यानी “सोनपरी पेक्षाही प्रचंड सुंदर” अशी कमेंट करत तिला कॉमप्लिमेंट दिली आहे. (Shivali Parab photoshoot )

हे देखील वाचा: रंजना चित्रपटात नम्रताची वर्णी?,चाहत्यांच्या कमेंटने वेधलं लक्ष
शिवाली आपल्याला “पोस्ट ऑफिस उघडं आहे” या मालिकेत दिसली होती. सध्या शिवाली “महाराष्ट्राची हायजत्रा” या कार्यक्रमात काम करत असून तिने हे फोटोज याच कार्यक्रमाच्या सेटवर काढल्याचं दिसत आहे. तर तुम्हाला शिवाली परबचे हे फोटोज कसे वाटले आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.