बॉलिवूड अभिनेता व आमिर खानचा भाचा असलेला इमरान खान गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून लांब आहे. २००८ मध्ये ‘जाने तू या जाने ना’ चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या इमरानने अनेक चित्रपटांत काम केले. नंतर, त्याच्या बऱ्याच चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर मोठं अपयश मिळाले. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘कट्टी बट्टी’ हा त्याचा शेवटचा चित्रपट होता. यानंतर अभिनेता मनोरंजन क्षेत्रात फारसा सक्रिय दिसला नाही.
मनोरंजन सृष्टीत फारसा सक्रिय नसलेला हा अभिनेता त्याच्या खाजगी आयुष्यामुळे मात्र अनेकदा चर्चेत आला आहे. त्याचबरोबर तो सोशल मीडियाद्वारेही चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली असून या पोस्टद्वारे त्याने त्याच्या नवीन घराबद्दलचे माहिती दिली आहे. अभिनेत्याने निसर्गाच्या सानिध्यात नवीन घर बांधल्यानंतर सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर करत त्याच्या घराची झळक दाखवली आहे.
इम्रान खानने त्याच्या नवीन घराचे काही फोटो शेअर करत एक मोठी पोस्टही लिहिली आहे. यामध्ये त्याने “पहिल्या वर्षी मी तिथला सूर्योदय आणि सूर्यास्त पाहिला, पावसाळ्यात नद्यांचा प्रवाह समजून घेतला आणि तेथील बदलते हवामान पाहिले. यानंतर घराचे स्केच तयार करण्याचे काम सुरू केले. कंत्राटदार आणि स्ट्रक्चरल अभियंता यांच्याशी बोलल्यानंतर, त्यांनी काँक्रीट स्लॅब लावण्याऐवजी क्लासिक ऑन-साइट पद्धती वापरल्या. या संपूर्ण प्रक्रियेचा मला खूप आनंद झाला. हे घर मी स्वतः बांधल्यामुळे त्याची किंमत आधीच बांधलेल्या व्हिलापेक्षा कमी होती”. असं म्हटलं आहे.

या पोस्टखाली त्याच्या अनेक चाहत्यांनी त्याच्या या नवीन घरानिमित्त कौतुक केले आहे. त्याला कमेंट्समध्ये अनेकांनी अभिनंदन व शूभेच्छाही दिल्या आहेत. मात्र यापैकी एका कमेंटने सर्वनाचे लक्ष वेधले आहे. एका नेटकऱ्याने इम्रानच्या या पोस्टवर “याच्याकडे इतके पैसे कुठून येतात?” असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर इम्रानने “मी २०००च्या दरम्यान काही चित्रपटांमध्ये काम केले.” असं उत्तर दिलं आहे.
दरम्यान, इम्रानने शेअर केलेल्या त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये असे दिसून येत आहे की, त्याने गेल्या काही वर्षांत स्वतःचे घर बांधले आहे. त्याने सांगितले की त्याला एक आलिशान व्हेकेशन व्हिला बनवायचा नाही तर निसर्गाच्या सानिध्यात एक घर बांधायचे होते जिथून त्याला निसर्गाचे सौंदर्य पाहता येईल.