‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा जगभरात लोकप्रिय असलेल्या कार्यक्रमांपैकी एक आहे. आजवर या कार्यक्रमाने त्याचा असा चाहतावर्ग तयार केला आहे. या कार्यक्रमाने लोकांना खळखळवून हसवण्याचा घेतलेला ध्यास हा कार्यक्रम आजही जपतोय. बार याशिवाय या कार्यक्रमाबाबत बोलायचं झाल्यास ते म्हणजे या कार्यक्रमातील कलाकार. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार मंडळींवर चाहत्यांनी, प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. मात्र जेव्हा या कार्यक्रमातील काही कलाकार मंडळी जेव्हा हा कार्यक्रम सोडून गेले तेव्हा मात्र बऱ्याच प्रेक्षकांनी नाराजी दर्शविली. (Vishakha Subhedar On Mhj)
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून जेव्हा लोकप्रिय अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने एक्झिट घेती तेव्हा हा धक्का हास्यजत्रेच्या प्रेक्षकांना पचवण्यास जड जाणारा होता. आजही विशाखाला, विशाखा व समीरच्या स्किटला प्रेक्षक मिस करत आहेत. आता सध्या हास्यजत्रेत विशाखा ईशा डेने घेतली आहे. नुकतीच विशाखाने ‘इट्स मज्जा’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यावेळी ईशा डेबाबत जेव्हा विशाखाला प्रश्न विचारला तेव्हा विशाखा स्पष्टच बोलली.
“‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये तुझी जागा ईशा डेने घेतली असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. याबाबत तुला काय वाटतं?” असा प्रश्न विशाखाला विचारण्यात आला. तेव्हा ती म्हणाली, “पिकलं पान गळून पडायचं, एक नवा अंकुर येतो तो झाडाला शोभा देतोच की… मग त्याचप्रमाणे ईशा डे तिच्या पद्धतीने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ करत आहे. तिच्या भूमिका ती उत्तम पद्धतीने करते. माझं पिकलं पान नसलं तरी त्या कार्यक्रमासाठी माझ काम झालं होतं. तिथून मी बाहेर पडले. माझी जागा तिने घेतली तर ती उत्तम काम करत आहे. त्याबद्दल मला जराही वाईट वाटत नाही. मी बहुतेक खूप मोठं वक्तव्य करत असेल पण तेव्हाही मी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे स्किट बघत नव्हते. मी आताही स्किट बघत नाही.”
“युट्युबवर चार चार मिनिटांचे जे व्हिडीओ येतात तेच मी वरवर बघते. त्याशिवाय मी काहीच फॉलो करत नाही. माझंच स्किट मी कधी बघितलं नाही. कारण मला माझं काम बघायला आवडत नाही. माझ्या उर्दुवाल्या भूमिकेसाठी लता मंगेशकर यांनी मला फोन केला. तेव्हा मला नवल वाटलं की त्यांना माझ्या या भूमिकेमध्ये नक्की काय आवडंल?. त्यांचा फोन आल्यानंतर फक्त माझं हे स्किट मी पाहिलं होतं. परफॉर्म केल्यानंतर कुठे चुकली आहे हे मला माहित असतं. चुक असेल तर मी पुन्हा बघते”.