Vishakha Subhedar Son’s Return : अमेरिका-इस्त्राईल यांच्या इराणवरील संयुक्त हल्ल्यानंतर संघर्ष अधिक तीव्र झाला होता. या युद्धजन्य परिस्थितीचा आंतरराष्ट्रीय हवाई मार्गावरही मोठा परिणाम झाला. या युद्धजन्य परिस्थितीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव आखाती देशांकडे जाणाऱ्या अनेक विमानसेवा तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकले होते.
या परिस्थितीचा फटका मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री Vishakha Subhedar यांनाही बसला होता. त्यांचा मुलगा अभिनय सुभेदार हा Kuwaitमध्ये अडकला असल्याची माहिती त्यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केली होती. त्या व्हिडीओमध्ये त्या खूप भावुक झालेल्या दिसत होत्या. मुलाला सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे मदतीची विनंती केली होती. विशाखा सुभेदार यांनी देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही मदतीचं आवाहन केलं होतं. या व्हिडीओनंतर अनेक चाहत्यांनी आणि नागरिकांनीही त्यांना पाठिंबा दर्शवला.
आणखी वाचा – “तुझं लग्न झालंय तरीही तू…”, ‘बिग बॉस’च्या घरात राखी-संकेतमध्ये जोरदार वाद, चप्पल फेकून मारली आणि…
दरम्यान, त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळालं असून अभिनय सुभेदार आता सुखरूप भारतात परतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या पाठपुराव्यानंतर त्याला सुरक्षितपणे भारतात आणण्यात मदत झाली. सध्या आई आणि मुलाच्या भेटीचा एक भावुक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बर्याच दिवसांनंतर मुलगा परत आल्यामुळे विशाखा सुभेदार खूप आनंदी झाल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा हळवा क्षण पाहून चाहत्यांनीही समाधान व्यक्त करत त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
आणखी वाचा – लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान स्टेजवर ढसाढसा रडली सुप्रसिद्ध गायिका, म्हणाली, “माझा आवाज खूप वाईट आहे”





