शुक्रवार, जुलै 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुझं लग्न झालंय तरीही तू…”, ‘बिग बॉस’च्या घरात राखी-संकेतमध्ये जोरदार वाद, चप्पल फेकून मारली आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 10, 2026 | 12:06 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Rakhi Sawant and Sanket Pathak Fight

"तुझं लग्न झालंय तरीही तू…", 'बिग बॉस'च्या घरात राखी-संकेतमध्ये जोरदार वाद, चप्पल फेकून मारली आणि…

Rakhi Sawant and Sanket Pathak Fight : Bigg Boss Marathi Season 6 च्या घरात नेहमीच काही ना काही घडताना दिसतं, ज्याची नेहमीच चर्चा रंगताना दिसते. अशातच आता ‘बिग बॉस’च्या घरात तीन वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एंट्री झाली आहे. मात्र, यापूर्वी वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एंट्री झालेल्या राखी सावंतची हवा काही कमी झालेली नाही. राखीने ‘बिग बॉस’च्या घरातील प्रत्येक स्पर्धकाला आरसा दाखविला आहे. अशातच आता समोर आलेल्या नव्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. कारण ‘बिग बॉस’च्या घरात संकेत आणि राखीमध्ये जोरदार वाद पेटला असल्याचं दिसतं आहे.

या प्रोमोमध्ये राखी संतापलेल्या आवाजात संकेतला म्हणताना दिसते, “तू चीटर आहेस… तुझ्यात खरं बोलायची हिम्मतच नाही.” तिच्या या आरोपावर संकेतही चिडतो आणि म्हणतो, “मी काय चीट केलंय?” यावर राखी आणखी संतापते आणि म्हणते, “तुझं लग्न झालं आहे… तरीही तू मुली पटवतोस. म्हणूनच तू चीटर आहेस.” राखीचे हे आरोप ऐकून संकेतचा पारा आणखी चढतो. तो तिला म्हणतो, “उगाच फालतुगिरी करू नको.” मात्र राखी थांबण्याच्या मूडमध्ये नसते आणि ती पुन्हा पुन्हा त्याला “चीटर” असं म्हणत राहते.

आणखी वाचा – लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान स्टेजवर ढसाढसा रडली सुप्रसिद्ध गायिका, म्हणाली, “माझा आवाज खूप वाईट आहे”

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

राखीचं सतत डिवचनं संकेतला सहन होत नाही. अशावेळी संतापलेला संकेत म्हणतो, “मला लाईन क्रॉस करायला लावू नको.” वाद इतका वाढतो की राखी रागाच्या भरात तिची चप्पल काढून संकेतच्या दिशेने फेकताना दिसते. हा प्रसंग पाहून घरातील वातावरण पूर्णपणे तापलेलं दिसतं. पुढे प्रोमोमध्ये संकेत खूपच संतापलेला दिसतो आणि “राखी, आता बघच तू…” असं म्हणत तिथून निघून जातो. आता घरात पेटलेला हा वाद पुढे किती वाढणार आणि त्याचे परिणाम काय होणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Tags: Bigg Boss Marathi 6rakhi sawantsanket pathak
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Taarak Mehta ka ooltah chashmah
Entertainment

वडिलांच्या निधनाची बातमी ऐकूनही शूटिंग ठेवलं सुरु, ‘तारक मेहता…’ फेम अभिनेत्याने सांगितलं कारण, म्हणाला…

जुलै 30, 2026 | 10:12 am
dev anand son suneil anand dies
Entertainment

देव आनंद यांच्या मुलाचे निधन, ७०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, अविवाहित राहिले कारण…

जुलै 29, 2026 | 10:34 am
 Badshah Isha Rikhi Marriage in Trouble
Entertainment

“मी गप्प राहिले कारण मला भीती वाटत होती”, सुप्रसिद्ध गायकाच्या पत्नीची धक्कादायक पोस्ट, चार महिन्यांपूर्वीच झालेलं लग्न…

जुलै 28, 2026 | 10:24 am
stories of Abhay Verma
Entertainment

मुलांनी घेरलं, घाणेरडं कृत्य केलं आणि…; भूमिकेची तयारी करताना सुप्रसिद्ध अभिनेत्याला समजलं होतं ट्रान्सजेंडर, म्हणालेला…

जुलै 27, 2026 | 11:10 am
Next Post
Ghabadkund movie

‘घबाडकुंड’ चित्रपट ठरणार मराठीतला पहिला युनिव्हर्स, मराठी कलाकारांच्या मांदियाळीची चर्चा, फर्स्ट लूक समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.