सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ऋता दुर्गुळेला पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेत्री भावुक, पतीकडूनही कौतुकाचा वर्षाव, म्हणाला, “तुला अपेक्षा आहे…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 6, 2025 | 3:33 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Hruta Durgule award

ऋता दुर्गुळेला पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेत्री भावुक, पतीकडूनही कौतुकाचा वर्षाव, म्हणाला, "तुला अपेक्षा आहे…"

Hruta Durgule award : नुकताच ६० आणि ६१ वा महाराष्ट्र चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड. आशिष शेलार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यंदाच्या या पुरस्कार सोहळ्याला अनेक बॉलिवूड कलाकारांचीही उपस्थिती पाहायला मिळाली. या सोहळ्यात राज कपूर जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना प्रदान करण्यात आला. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार गझलगायक भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात आला. तसंच, चित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना प्रदान करण्यात आला.

तर मृण्मयी देशपांडेला सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर आर्या आंबेकरला उत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळाला. तर लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळेला अनन्या या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला. याबाबतचा आनंद तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्टद्वारे शेअर केला आहे. हृताने ट्रॉफीबरोबरचा फोटो शेअर करत लिहिलं, “मी कृतज्ञतेने भारावून गेले आहे. ६० व्या ६१ व्या महाराष्ट्र राज्य पुरस्कारांमध्ये माझ्या ‘अनन्या’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल मला अभिमान आहे. मी अधिक परिश्रम करण्यास आणि अर्थपूर्ण प्रोजेक्ट निवडण्याचा प्रयत्न करेन”.

आणखी वाचा – मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याला काजोलचा हिंदी बोलायला नकार, पापराजींवर भडकली, म्हणाली, “ज्याला जे समजायचंय…”

View this post on Instagram

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

पुढे अभिनेत्रीने ‘अनन्या’ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रताप फड यांना टॅग करत त्यांचे अभिनंदन केले. हृताने लिहिले, “सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा दिग्दर्शक पुरस्कार तुम्हाला मिळाला, त्यासाठी मी खूप आनंदी आहे. तुम्ही मला ‘अनन्या’ या चित्रपटासाठी कास्ट केले, त्यासाठी मी कायमच तुमची ऋणी असेन. तुमच्याशिवाय हे शक्य झाले नसते. माझा प्रत्येक पुरस्कार तुम्हाला समर्पित असेल”, असं म्हणत आनंद व्यक्त केला. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने तिच्या या प्रवासात साथ देणाऱ्या अनेकांचे आभार मानले आहेत. तसेच, चित्रपटाचे निर्माते रवी जाधव यांच्याप्रतिदेखील कृतज्ञता व्यक्त केली आहे. अभिनेत्रीने पती प्रतीक शाहचेदेखील आभार मानले आहेत. तिने प्रतीकला टॅग करत लिहिले, “तुझ्या माझ्या आयुष्यात असण्याने तू माझं जग आणखी उत्तम केले आहेस”. शेवटी तिने तिच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर साथ देणाऱ्या तिच्या कुटुंबाचेदेखील आभार मानले आहेत.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा घोडबंदर रोडवर मनस्ताप, ट्रॅफिक, खड्ड्यांमध्ये हाल झाल्यानंतर काय केलं पाहा, म्हणाला, “जीव मुठीत घेऊन प्रवास…”

View this post on Instagram

A post shared by Prateek Shah (@prateekshah1)

ऋताला पुरस्कार मिळताच तिचा पती प्रतीक शाहने देखील बायकोचं तोंडभरून कौतुक केलं. प्रतीकने हृतासाठी खास पोस्ट शेअर करत लिहिलं की, “महाराष्ट्र राज्य सर्वोत्कृष्ट पदार्पण हा पुरस्कार तुला मिळाल्याने सर्वत्र प्रथम अभिनंदन. मला तुझा खूप अभिमान आहे. तुला अपेक्षा आहे त्याहीपेक्षा तू खूप पुढे जाणार आहेस. माझी सुपरस्टार”.

Tags: hruta durgulemarathi actressmarathi movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
will smith performing 

लाईव्ह परफॉर्मन्स सुरु असतानाच अंतर्वस्त्र फेकलं आणि…; कलाकारानेच दाखवलं नेमकं काय घडलं, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.