लावणी म्हणजे प्रेक्षकांना खुर्चित खिळवून ठेवण्याची अनोखी कला. ही कला ज्या स्त्रीला अवगत झाली तिने आतापर्यंत प्रत्येक संधीचं सोनं केलं. बऱ्याच मराठी अभिनेत्रींनी आजवर मराठी चित्रपटांमध्येही सादर केलेली लावणी प्रेक्षकांच्या कायमस्वरुपी लक्षात राहिली. शिवाय लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी तर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. लावणी म्हटलं की, ढोलकीची थाप, घुंगरांचा आवाज कानी घुमू लागतो. पण अलिकडे काही अंशी लावणीची परिभाषा बदललेली दिसते. लावणी सादर करणाऱ्या काही मुली वेगळ्याप्रकारे नऊवारी साडी नेसत केस मोकळे सोडतात. याचबाबत आता लावणीचे कार्यक्रम करणारी हिंदवी पाटील हिने भाष्य केलं आहे. (hindavi patil talk about lavani)
नऊवारी साडीवर मोकळे केस सोडत लावणी करणाऱ्यांना तिने सुनावलं आहे. पण तिचा नक्की इशारा कोणाकडे? हा प्रश्नही उपस्थित होत आहे. एबीपी माझा वाहिनीशी संवाद साधताना हिंदवी म्हणाली, “नऊवारी नेसून, केस मोकळे सोडून लावणी करणं हे मला तरी योग्य नाही वाटलं. कधीच मी हे केलं नाही. आधीही मला असं आपण करावं असं वाटलं नाही. आताही वाटत नाही. जेव्हा माझ्याकडे कोणी बोट दाखवेल तर त्याला उत्तर द्यायला मी ठामपणे उभी आहे”.
आणखी वाचा – Video : लांबसडक केसांसाठी माधुरी दीक्षित करते घरगुती उपाय, घरीच बनवते तेल, व्हिडीओद्वारे दाखवली संपूर्ण झलक
“मला तुम्ही कधी दाखवून द्यायचं की, पूर्ण नऊवारीमध्ये मी कधी केस मोकळे सोडले आहेत. माझ्या पायामध्ये तीन-तीन किलोचे घुंगरु असतात. पायातले घुंगरु ते केसातील आंबाडापर्यंत अंग झाकून सजलेली जी स्त्री असते तिचं सौंदर्य एखाद्या फुललेल्या मोगऱ्यासारखं असतं. ज्याचा वास सर्वत्र दरवळतो. मग या सगळ्या गोष्टी कोणी बदलायला सांगितल्या. अरे लिहून काय ठेवलंय की, त्या बाईचं सौंदर्य, तिचा अंबाडा, ती गाते त्या पद्धती लिहून ठेवल्या आहेत”.
आणखी वाचा – टायगर भाईच्या भूमिकेत विजय निकम गाजवणार मोठा पडदा, ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटात असणार मोठं सरप्राइज
पुढे ती म्हणाली, “कंबरेचा कमरपट्टा कसा हालतो? हेही लिहून ठेवलं आहे. पायातला घुंगरु काय व कशापद्धतीने बोलतोय, ढोलकीची थाप व हातातल्या बांगड्यांचा आवाज हे सगळं लिहून ठेवलंय. हे सगळं आपण बदलणारे कोण?”. हिंदवी पूर्ण नऊवारी साडीमध्ये लावणी सादर करताना दिसते. त्याचबरोबरीने तिने नऊवारीवर लांबसडक केस सोडलेले कधीच दिसले नाहीत. गौतमी पाटील मात्र नऊवारी साडी नेसून केस मोकळे सोडत लावणी करते. पण यावर हिंदवीने तिचं मांडलेलं मत खरंच कौतुकास्पद आहे.