गेले दोन दिवस अवकाळी पावसामुळे राज्यभरात सगळ्यांचीच तारांबळ उडाली आहे. २०, २१ मेलाही मुंबईला वादळी वाऱ्यासह तुफान पावसाने झोडपलं. काही भागातील रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं. मुंबईतील पहिला तुफान पाऊस आणि नागरिकांची अगदी तारांबळ उडाली. मात्र पहिल्या पावसातच मुंबईची वाईट अवस्था सगळ्यांसमोर उघड झाली. पावसापूर्वी सरकारद्वारे नालेसफाईची कामं केली जातात. त्याचबरोबरीने कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावण्याची तयारी करण्यात येते. मात्र यावेळी काही वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. मुंबईत राहत असताना बहुदा नागरिकही स्वच्छपणा कसा ठेवावा? हे विसरले असावेत. तुफान पावसानंतर रस्त्यांवर पाण्याबरोबरच कचऱ्याचा ढिग वाहताना दिसला. रस्तेच कचरामय झाले. हे दृश्य पाहून मराठी कलाकाराला राग अनावर झाला. (Mumbai rain viral video)
मुंबईच्या रस्त्यांवर कचराच कचरा
गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यभराच चांगलाच पाऊस झाला. कुलाबामध्ये २३ मिमी तर सांताक्रुझमध्ये ६२ मिमी पावसाची नोंद झाली. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे सगळेच हैराण झाले. मात्र या सगळ्या परिस्थितीत मुंबईतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुंबईच्या रस्त्यावर कचराच कचरा वाहताना दिसत आहे. ते दृश्य पाहून अगदी तुम्हालाही किळस वाटेल. मात्र यामध्ये नक्की दोष कोणाचा? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
पाहा व्हिडीओ
आणखी वाचा – करवलीचा नखरा! भावाच्या लग्नात कार्तिकी गायकवाडचीच हवा, हळदीच्या ड्रेसपुढे नवरीही फिकी
रस्त्यांना कचऱ्याचं स्वरुप
मुंबईतील साकीनाका परिसरातील हा व्हिडीओ आहे. यामध्ये पाण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात कचरा वाहून आलेला दिसत आहे. हे दृश्य पाहून अनेकांना धसकाच बसला. पहिल्याच पावसात निर्माण झालेली परिस्थिती धडकी भरवणारी होती. व्हिडीओ पाहून सुप्रसिद्ध अभिनेता सुमित राघवन म्हणाला, “एका पावसात आपली आणि आपल्या महानगरपालिकेची लायकी कळाली. हे चक्क साकीनाका आहे”.

जबाबदारी कुणाची?
खरंतर महानगरपालिकेती जबाबदारी परिसर स्वच्छ ठेवणं आहे. पण त्याचबरोबरीने कचऱ्याची नीट विल्हेवाट लावणे, कुठेही कचरा न फेकणे ही तितकीच नागरिकांचीही जबाबदारी आहे. घराबरोबरच आजूबाजुचा परिसरही स्वच्छ ठेवणंही तितकंच गरजेचं आहे. प्रत्येकाने असा विचार केला तरच शहर स्वच्छ व कचरामुक्त होईल. साकीनाकाचाही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तेथील प्रशासनाने तातडीने दखल घेत वाहून आलेला कचरा साफ केला. मात्र उद्भवलेली परिस्थिती ही भयावह होती हेही तितकंच खरं आहे.