‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध शोचे लेखक व दिग्दर्शक सचिन गोस्वामी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. हास्यजत्रेच्या मंचावर ते जितके खुलेपणाने वावरतात, तितकेच ते सोशल मीडियावरही चाहत्यांशी मनमोकळेपणाने व्यक्त होतात. राजकारण असो, किंवा सामाजिक; कुठल्याही मुद्द्यांवर सचिन गोस्वामी आपलं रोखठोक मत नेहमीच मांडत असतात, ज्याची चर्चा वारंवार होते.(sachin goswami maharashtrachi hasya jatra)
काय म्हणाले दिग्दर्शक सचिन गोस्वामी ? (Sachin Goswami facebook post)
सचिन गोस्वामी यांनी नुकतीच एक फेसबुक पोस्ट केलीये. ज्यात त्यांनी सध्याची माध्यमे व पत्रकारितेवर चांगलीच आगपाखड केली. त्याचबरोबर त्यांनी आजच्या काळात निःस्पृह, निर्भिड पत्रकारितेची गरज असल्याचे त्यांनी यात व्यक्त केलंय. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलंय, “राजकीय निलाजरेपणाला ‘मास्टर स्ट्रोक’ म्हणून गौरवणाऱ्या माध्यमांनी खरंतर लोकशाही धोक्यात आणली आहे. जनतेचा आवाज बनून सत्ताधीशांवर अंकुश ठेवण्याऐवजी भाटगिरीत धन्यता मानणारी पत्रकारिता ही या ऱ्हासास कारणीभूत असलेल्या घटकांपैकी एक महत्त्वाची घटक आहे.. आज निःस्पृह, निर्भिड पत्रकारितेची गरज आहे. (मोजके सन्माननीय अपवाद आहेत.. तेच आशादायी आहे.)” सचिन गोस्वामींच्या या पोस्टवर असंख्य नेटकऱ्यांनी कमेंट्सद्वारे आपलं मत मांडलं असून नेटकऱ्यांच्या कमेंट्सवर त्यांनी प्रतिसादही दिला आहे. (Sachin Goswami facebook post)

लेखक-दिग्दर्शक सचिन गोस्वामी हे हास्यजत्रेचे मुख्य सूत्रधार असून शोच्या माध्यमातून ते गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक विनोदी सिनेमेही दिग्दर्शित केले असून त्यांच्या प्रोडक्शन हाऊसअंतर्गत ‘तुजं माजं सपान’ ही मालिका सध्या सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच सचिन गोस्वामी आपल्या कुटुंबासह यूरोप टूरवर गेली होती.
हे देखील वाचा : ‘मतदारांची ऐशी तैशी..’ म्हणत महाराष्ट्रातील सत्तानाट्यावर भडकले सचिन गोस्वामी