शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कॉलेजमध्ये असताना मैत्री, प्रेम अन्…; निलेश साबळेच्या पत्नीने सांगितली रिअल लाइफ लव्हस्टोरी, म्हणाली, “त्याला मी आवडायचे आणि…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 9, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Hastay Na? Hasaylach Pahije show fame. Dr. Nilesh Sable's wife told their love story know more

कॉलेजमध्ये असताना मैत्री, प्रेम अन्...; निलेश साबळेच्या पत्नीने सांगितली रिअल लाइफ लव्हस्टोरी, म्हणाली, "त्याला मी आवडायचे आणि..."

“हसताय ना? हसायलाच पाहिजे” असं म्हणत प्रेक्षकांना आपलसं करणारा निवेदक व अभिनेता म्हणजे डॉ. निलेश साबळे. गेल्या काही वर्षांपासून ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाची एकहाती सूत्रे सांभाळणारा हा अवलिया कलावंत. केवळ निवेदनच नाही तर लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या सर्व जबाबदाऱ्याही अगदी लिलया पेलतो. आयुर्वेदाची एम.एस. ही पदवी घेतल्यानंतर निलेशने ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या कार्यक्रमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर त्याने ‘फू बाई फू’ या कार्यक्रमातूनही प्रेक्षकांची मनं जिंकली आणि मग ‘चला हवा येऊ द्या’ या प्रसिद्ध कार्यक्रमाच्या दिग्दर्शन व सुत्रसंचलनाची धुरा सांभाळत त्याने गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केलं.

मनोरंजन क्षेत्रात आल्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिलं नाही. मात्र त्याचा इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता. या प्रवासात त्याला साथ मिळाली ती त्याच्या कुटुंबियांची. मुख्यत: त्याची पत्नी गौरीची. निलेश व गौरी एका कॉलेजमध्ये नसतानाही त्यांची ओळख झाली. निलेश एका कार्यक्रमानिमित्त गौरीच्या कॉलेजमध्ये गेला असता तिथं गौरीबरोबर त्याची ओळख झाली. त्यानंतर दोघं एकमेकांचे चांगले मित्र बनले, नंतर या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. त्यांची ही लव्हस्टोरी नेमकी कशी होती?, नक्की कुणी कुणाला प्रपोज केलं?, याबद्दल निलेशची पत्नी गौरी साबळेने सांगितले आहे.

View this post on Instagram

A post shared by ArtGauri (@ayurgau)

आणखी वाचा – बाप म्हणून चारुहास यांचा स्वीकार करणार का अधिपती?, दोघांनाही एकत्र आणण्यासाठी अक्षराचे प्रयत्न, भूवनेश्वरी नवी खेळी खेळणार

गौरीने नुकतीच ‘असोवा’ या युट्यूब वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या व निलेश साबळेच्या लव्हस्टोरीबद्दल सांगताना असं म्हटलं की, “आम्ही दोघे मित्र-मैत्रीण होतो. निलेशला मी आवडायचे हे पूर्ण कॉलेजला माहित होते. कॉलेजच्या बाहेरच्या लोकांनाही हे माहीत होतं. माझं कॉलेजच्या स्टाफलादेखील निलेशला मी आवडते हे माहीत होतं. आम्ही एकमेकांशी खूप बोलायचो. चार-चार तास आम्ही गप्पा मारायचो. त्यामुळे हा आपल्या थेट का बोलत नाही? हा प्रश्न मला पडायचा. निलेश बाकीच्या सर्व लोकांना सांगतोय की, ही मला आवडते पण तो मला काहीच बोलत नव्हता”.

आणखी वाचा – दोनवेळा मोडला संसार, घटस्फोटाचं दुःख सहन करण्यावरुन पहिल्यांदाच खुलेपणाने बोलली श्वेता तिवारी, म्हणाली, “माझी फसवणूक…”

यापुढे ती असं म्हणाली की, “मग आम्ही एक दिवशी एकमेकांना भेटायचं असं ठरवलं आणि आम्ही कोल्हापूरला भेटलो. तेव्हा ‘ओम शांती ओम’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. तेव्हा तो चित्रपट बघायचा आम्ही ठरवलं आणि त्या चित्रपटाच्या मध्यांतरात मी निलेशला विचारलं की, “संपूर्ण कॉलेज, माझ्या सगळ्या मैत्रिणी, कॉलेजचा स्टाफ या सर्वांना माहीत आहे की, मी तुला आवडते. मग हे तू मला का सांगत नाहीयेस”. यावर तो म्हणाला, “तुला माहीत आहे मग तू उत्तर दे ना”  असं म्हणाला. मग मी त्याला “उत्तराशिवाय मी इथे आले का?, मी आले म्हणजे याचं उत्तर हो आहे” असं म्हटलं. दरम्यान, निलेश साबळे सध्या ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

Tags: Dr. Nilesh SableDr. Nilesh Sable Love Storymarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
10 july 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

तूळ, मकर व कुंभ राशीच्या लोकांसाठी बुधवारचा दिवस भाग्याचा, नोकरी-व्यवसायात निर्माण होणार नवीन संधी, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.