शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“७५ पेक्षा जास्त वय असूनही…”, बिनधास्त मुलगीच्या आजीचीही निलेश साबळेच्या कार्यक्रमात एन्ट्री, उत्साह पाहून म्हणाला, “या वयात…”

Saurabh Moreby Saurabh More
मे 20, 2024 | 3:27 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Hastay na hasaylach pahije fame Nilesh Sable shared appreciating post for the content creator bindhast mulgi’s grandmother

"७५ पेक्षा जास्त वय असूनही...", बिनधास्त मुलगीच्या आजीचीही निलेश साबळेच्या कार्यक्रमात एन्ट्री, उत्साह पाहून म्हणाला, "या वयात..."

सध्या सोशल मीडियावर असंख्य कंटेट क्रिएटर्स आहेत. पण काही कंटेंट क्रिएटर्सनी आपल्यातल्या वेगळ्या कौशल्याने नेटकऱ्यांसह अनेकांची मनं जिंकली आहेत. यापैकीच एक म्हणजे लोकप्रिय व प्रसिद्ध कंटेट क्रिएटर म्हणजे बिनधास्त मुलगी फेम गौरी पवार. छोटीशी दिसणारी पण आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारी गौरी पवार सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.

गौरी ही तिच्या आजीबरोबरचे अनेक व्हिडीओ शेअर करत असते. त्यामुळे तिच्यासह तिची आजीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. मोबाईलच्या स्क्रीनवरील या आजी-नातीच्या लोकप्रिय जोडीने नुकतीच टीव्हीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’मध्ये हजेरी लावली होती. यानिमित्ताने या विनोदी कार्यक्रमाचा निवेदक, दिग्दर्शक व अभिनेता निलेश साबळेने या आजींसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Nilesh Sabale (@dr.nilesh_sabale_official)

या पोस्टमध्ये निलेश साबळेने आजींचे कौतुक करत असं म्हटलं आहे की, “काही जणांसाठी वय हा फक्त आकडा असतो. सध्या आपल्या ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ या कार्यक्रमात काही रील बनविणाऱी कुटुंब सहभागी होत आहेत. ७५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या गौरी पवारच्या आजीसुद्धा सहभागी झाल्या आहेत. या वयातसुद्धा आयुष्याचा आनंद घ्यायचा ही गोष्ट यांच्याकडून शिकण्यासारखी आहे.”

आणखी वाचा – यामी गौतमने चिमुकल्याला दिला जन्म, मुलाचं नावंही ठेवलं आहे फारस खास, नावाचा अर्थ आहे…

गौरी व तिच्या आजीच्या व्हिडीओला नेटकरी नेहमीच चांगला प्रतिसाद देताना पाहायला मिळतात. दोघी अनेकदा त्यांचे काही विनोदी व विचार करायला लावणारे व्हिडीओ शेअर करत असतात आणि त्यांचे हे व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीसही पडतात.

आणखी वाचा – मुलगा झाला हो! यामी गौतम झाली आई, नावही केलं जाहीर, म्हणाली, “आमच्या मुलाच्या”

दरम्यान, गौरी ही सोशल मीडियावर कंटेट क्रिएटर असण्याबरोबरच एक कलाकारही आहे. ती सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करण्यासह उत्तम स्केच व पेटींगही काढते. ती मुळची मुंबईकर असली तरी कोकणात गावी गेल्यावर तिच्या आजीबरोबरचे व्हिडीओ शेअर करत असते. त्यामुळे या ‘बिनधास्त मुलगी’सह तिची आजीदेखील एक सोशल मीडिया कंटेट क्रिएटर आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही.  

Tags: Bindhast MulgiBindhast Mulgi grandmotherentertainment newsnilesh sable
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
gautami Patil trolled for danced at fort video viral on social media

"गडकिल्ल्यावर बाई कधीच नाचली नाही", गौतमी पाटीलचा 'तो' व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले, "जाहीर निषेध कारण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.