शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेला बहूचर्चित ‘हनुमान’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित, जाणून घ्या कधी व कुठे पाहता येणार?

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 17, 2024 | 4:28 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Hanuman movie released on ott at 16 march see the details

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेला बहूचर्चित ‘हनुमान’ चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित, जाणून घ्या कधी व कुठे पाहता येणार?

अभिनेता तेजा सज्जाची मुख्य भूमिका असलेला हनुमान हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने भरपूर कमाई करत प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. अनेक बिग बजेट चित्रपटांना मागे टाकत ‘हनुमान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. अशातच आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात झाला आहे. हा चित्रपट महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर ओटीटीवर प्रदर्शित होणार होता. पण अखेरीस या काल या चित्रपटाला ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी मुहूर्त सापडला आहे.

१६ जानेवारी म्हणजेच काल हा चित्रपट ओटीटी माध्यमावर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. झी-५ वर इंग्रजी सबटायटल्ससह हा चित्रपट तेलगूमध्ये प्रदर्शित झाला आहे. हनुमान हा चित्रपट जिओ सिनेमावरही दिसत आहे. जिओ सिनेमावर हा चित्रपट दक्षिण भारतीय भाषेत नाही. या प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट हिंदीत इंग्रजी सबटायटल्ससह पाहू येऊ शकतो. शनिवारी संध्याकाळी ८ वाजता कलर्स सिनेप्लेक्सवर या चित्रपटाचा प्रीमियरही झाला आहे.

Brahmaand ka sabse pehla SUPERHERO ab aayega aapke TV screens par! ????????

16 March raat 8 baje, dekhiye #HanuMan ka World Television Premiere, Hindi mein pehli baar, Colors Cineplex aur JioCinema par.@tejasajja123 @Actor_Amritha @Primeshowtweets @RKDStudios @Colors_Cineplex… pic.twitter.com/0Uq7qg6Efh

— Prasanth Varma (@PrasanthVarma) March 8, 2024

आणखी वाचा – लता मंगेशकरांशी तुलना झाल्यामुळे अनुराधा पौडवाल यांचा बॉलिवूडला अलविदा, स्वत:चा खुलासा करत म्हणाल्या, “संगीताला महत्त्व…”

दिग्दर्शक प्रशांत वर्माचा सुपरहिरो आधारीत ‘हनुमान’ या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अभिनेता  तेजा सज्जाची भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. या चित्रपटातील व्हीएफक्स आणि इतर तांत्रिक बाबींचेही कौतुक झाले होते. चित्रपटगृहांमध्ये कमाल दाखवल्यानंतर आता हनुमान चित्रपट ओटीटीवरही प्रदर्शित झाल्यामुळे चाहत्यांमध्ये व प्रेक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कारण ज्यांना काही कारणास्तव हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये जाऊन बघता आला नव्हता, ते हा चित्रपट आता ओटीटीवर घरबसल्या पाहू शकतात.

आणखी वाचा – “जे राष्ट्र गीत व्हायला हवं होतं ते दुर्दैवाने…”, शरद पोंक्षे यांचं मोठं विधान, काँग्रेसचाही केला उल्लेख, म्हणाले, “भारताला याचे परिणाम…”

दरम्यान, हनुमान चित्रपटाने वर्ल्ड वाइड बॉक्स ऑफिसवर १०० कोटींहून अधिक कमाई केली. या चित्रपटात अमृता अय्यर, वरलक्ष्मी सरथकुमार, राज दीपक शेट्टी आणि विनय राय यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट १२ जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. अशातच आता ओटीटीद्वारेही हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज आहे.  

Tags: Hanuman MovieHanuman OTT Releasedott entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Aly Goni Viral Post
Entertainment

“जम्मूमध्ये माझं कुटुंब हल्ले सहन करतायत”, भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध अभिनेता काळजीत, सांगितली सत्य परिस्थिती…

मे 9, 2025 | 5:35 pm
Pakistani Person Viral Video
Social

“त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

मे 9, 2025 | 4:08 pm
Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
Next Post
Elvish Yadav is arrested by Noida police in snake venom case

‘बिग बॉस’ फेम एल्विश यादवला अटक, पार्ट्यांमध्ये सापाचे विष पुरवल्याप्रकरणी नोएडा पोलिसांची कारवाई

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.