शनिवार, जून 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गायब झाल्यानंतर गुरुचरण सिंह पुन्हा ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये पुन्हा परतणार का? अभिनेता उत्तर देत म्हणाला, “निर्मात्यांनी पैसे…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 7, 2024 | 3:48 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Gurucharan Singh talked on he will return in Taarak Mehta Ka Ooltah Chashma know more

गायब झाल्यानंतर गुरुचरण सिंह पुन्हा ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये पुन्हा परतणार का? अभिनेता उत्तर देत म्हणाला, “निर्मात्यांनी पैसे...”

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या सुप्रसिद्ध मालिकेतील लोकप्रिय पात्र रोशन सिंह म्हणजे गुरुचरण सिंह बेपत्ता झाला होता. त्याच्या अचानक बेपत्ता होण्याच्या वृत्ताने त्याच्या कुटुंबियांसह चाहत्यांमध्येही भीतीचे वातावरण झाले होते. तो जवळपास महिनाभर बेपत्ता होता. गुरुचरण चरण सिंह २२ एप्रिल रोजी दिल्लीहून मुंबईला रवाना होणार होता. मात्र तो मुंबई शहरात पोहोचला नसल्याचे २६ एप्रिल रोजी समोर आले. दिल्ली विमानतळावर तो दिसला पण त्यानंतर तो कुठे गेला हे कोणीच पाहिले नाही. त्यानंतर वडिलांनी पालम पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. 

यादरम्यान घरी परतल्यानंतर अभिनेत्याने खुलासा केला होता की, तो धार्मिक यात्रेला गेला होता. संसाराचा त्याग करुन तो घरातून निघून गेला. या २५ दिवसांत तो कधी अमृतसर तर कधी लुधियाना येथे होता. या दिवसांत त्याने अनेक शहरांतील गुरुद्वारांमध्ये मुक्काम केला होता. अभिनेता अचानक बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या ऐवजी ‘तारक मेहता…’मध्ये त्याची भूमिका दूसरा कलाकार साकारत आहे. अशातच या मालिकेत तो पुन्हा दिसणार का? याबद्दल त्याने भाष्य केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Gurucharan Singh official (@sodhi_gcs)

अभिनेता ०६ जुलै रोजी मुंबई विमानतळावर दिसला, अनेक महिन्यांनंतर तो मुंबई शहरात पहिल्यांदा दिसला. यावेळी पापाराझींशी त्याने संवाद साधला. यावेळी अभिनेत्याला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांनी त्याला पैसे दिले आहेत का?, असा प्रश्न विचारला. यावर गुरुचरणने “हो. निर्मात्यांनी जवळपास सर्व पैसे दिले आहेत” असं म्हटलं.

आणखी वाचा – “ज्यांच्या घरातली स्त्री दु:खी…”, ‘धर्मवीर-२’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित, प्रसाद ओकच्या ‘त्या’ संवादाने वेधलं लक्ष

गुरचरण सिंगच्या चाहत्यांना शोमधील त्याचे पात्र खूप आवडले होते. त्यामुळे तो मालिकेत परत येईल का? हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुके त्याच्या या शोमध्ये पुन्हा येण्याबद्दल अभिनेता म्हणाला, “देव जाणो! परमेश्वराला माहीत आहे, मला काहीच माहीत नाही. मला कळताच, मी तुम्हांला कळवीन”.

आणखी वाचा – गेली ४४ वर्षे करण जोहर देतोय ‘या’ गंभीर आजाराशी झुंज, स्वत:च खुलासा करत म्हणाला, “यावर मात करण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण…”

दरम्यान, गुरुचरण चरण सिंह २२ एप्रिल रोजी दिल्लीहून मुंबईला रवाना होणार होता. मात्र तो मुंबई शहरात पोहोचला नसल्याचे २६ एप्रिल रोजी समोर आले. दिल्ली विमानतळावर तो दिसला. पण त्यानंतर तो कुठे गेला हे कोणीच पाहिले नाही. त्यानंतर वडिलांनी पालम पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. मग २५ दिवसांनी तो पुन्हा आपल्या घरी सुखरूप परतला.

Tags: entertainment newsgurucharan singhTarak Mehta Ka Ooltah Chashma
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Prapti Redkar
Entertainment

‘सावली’ साकारताना संगीताशी घट्ट नातं जडलं, माझे माहेर पंढरी २.०’ शूट करताना प्राप्ती रेडकरला अश्रू अनावर

जून 20, 2026 | 3:16 pm
 kanika maheshwari faced harassment
Entertainment

अश्लील इशारे, घाणेरडी नजर आणि…; १३व्या वर्षी अभिनेत्रीसह घडला वाईट प्रकार, म्हणाली…

जून 20, 2026 | 1:00 pm
Raghavendra Rao Viral Video
Entertainment

दिग्दर्शकाचा स्वतःवरचा ताबा सुटला?, अभिनेत्रीला जवळ ओढलं आणि…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जून 20, 2026 | 11:30 am
sunil grover sleeps on footpath
Entertainment

थेट फुटपाथवर चादर पसरून रात्र काढली, सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला पाहून नेटकरी अवाक, म्हणाले

जून 20, 2026 | 9:40 am
Next Post
Tula Shikvin Changlach Dhada serial update Charuhas is proud of his son Adhipati

Video : बाप तो बापच! चारुहासला वाटतोय आपल्या लेकाचा अभिमान, अधिपतीला कळणार का बापाचं प्रेम?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.