Guru Randhawa And Udit Narayan Kiss : बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांनी आजवर त्याच्या गायनाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्याने अलीकडेच त्याच्या लाइव्ह शोमध्ये एका महिला चाहतीला किस केले. त्यानंतर सोशल मीडियावर सर्वत्र खळबळ उडाली आणि त्यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. त्यांनी चाहत्यांच्या क्रेझचा हवाला देण्याच्या आपल्या कृतींचा बचाव देखील केला आहे. परंतू, त्यादरम्यान पंजाबी गायक-अभिनेता गुरु रंधावा यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला चाहती त्याला किस करताना दिसत आहे. परंतू गायकाने ज्या प्रकारे त्या चाहतीच्या प्रेमाला प्रतिक्रिया दिली त्या कृतीचं कौतुक केले जात आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये गुरु रंधावा स्टेजवर परफॉर्म करत आहे. यादरम्यान एक महिला चाहती त्यांना एक भेट देते. ती त्यांच्याबरोबर सेल्फी क्लिक करते, परंतु नंतर अचानक गायकाला किस करते. हे पाहून गायकाला धक्का बसतो. त्यानंतर तो त्या महिला चाहतीपासून दूर जात अंतर ठेवताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते त्याचे कौतुक करत आहेत. गायकाच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत त्याच कौतुक केलं आहे तर उदित नारायण यांना ट्रोल केलं आहे.
या व्हिडीओवर, एका चाहतीने कमेंट करत, “गुरु रंधावाचा आदर”, असं म्हटलं आहे. तर दुसर्याने लिहिले आहे की, “गुरु रंधावा मुलींचा आदर करतो”. तर आणखी एकाने लिहिले, “फक्त गुरु रंधावा”. त्याच वेळी, बर्याच लोकांनी उदितसाठी भाष्य केले. गायकाला ट्रोल करत एकाने असं म्हटलं की, “भावाला वाटते की ती इमरान हश्मी आहे”.
अलीकडे, गुरु रंधावाचे नाव पंजाबी गायक-अभिनेत्री शाहनाझ गिल यांच्याशी जोडले जाताना दिसले. विशेषत: जेव्हा त्यांचे गाणे प्रदर्शित झाले तेव्हा गुरु रंधावाने या नात्याला स्पष्टपणे नकार दिला आणि या चर्चांना पूर्णविराम दिला.