शनिवार, एप्रिल 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रेम, अफेअर अन् कौटुंबिक गोडवा; ‘गुलकंद’चा धमाकेदार ट्रेलर, सई ताम्हणकर-समीर चौघुलेची धमाल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 9, 2025 | 6:01 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Gulkand Trailer

‘गुलकंद’चा धमाकेदार ट्रेलर, सई ताम्हणकर-समीर चौघुलेची धमाल

Gulkand Trailer : सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती म्हणजे ‘गुलकंद’ चित्रपटाची. ‘गुलकंद’ या चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे. रॉमकॉम कथानक असलेल्या चित्रपटाच्या आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मराठी सिनेसृष्टीतील चित्रपटांमध्ये वेगवेगळे प्रयोग हे नेहमीच पाहायला मिळतात, आता देखील हा गुलकंद मार्फत केलेला नवा प्रयोग चित्रपटगृहात लवकरच पाहायला मिळाणार आहे. गुलकंद हा मल्टीस्टारर चित्रपट आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. हा सिनेमा एक फॅमिली ड्रामा असणार आहे, त्यामुळे संपूर्ण कुटुंबासह या चित्रपटाचा आस्वाद प्रत्येकाला घ्यायला मिळणार आहे. तसेच तगड्या स्टारकास्टने या चित्रपटात नेमकी काय धमाल केली आहे याची प्रचिती ट्रेलरवरून येतेय.

‘एव्हरेस्ट एंटरटेनमेंट’ प्रस्तुत आणि ‘वेटक्लाऊड प्रोडक्शन्स’ निर्मित ‘गुलकंद’ हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या सिनेमाचा ट्रेलर ९ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. ‘गुलकंद’मध्ये सई ताम्हणकर आणि समीर चौघुले ही भन्नाट जोडी पहिल्यांदाच एकत्र आली असून, प्रसाद ओक आणि ईशा डे यांची जोडीही प्रथमच एकत्र दिसणार आहे. या दोन अफलातून जोडप्यांची कहाणी ‘गुलकंद’मध्ये पाहायला मिळेल.

आणखी वाचा – कुणाल कामराला ‘बिग बॉस’ची ऑफर, शोमध्ये एन्ट्री करण्यावरुन म्हणाला, “या शोमध्ये जाताना…”

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

“१ मे रोजी मिळणारा गुलकंद आहे संसारात मुरलेल्या प्रत्येकासाठी… एकदा चाखाल तर परत परत मागाल”, असे कॅप्शन देत ‘गुलकंद’चा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे. सई आणि समीर यांनी ढवळे कपलची भूमिका तर माने कुटुंबाच्या भूमिकेत प्रसाद आणि ईशा आहेत. त्यांच्या मुलांचे एकमेकांवर प्रेम जडल्याचे दाखवण्यात आले आहे, मात्र त्यांचे लग्न जुळवताना नीता ढवळे (सई ताम्हणकर) आणि गिरीश माने (प्रसाद ओक) यांची लग्नापूर्वीची मैत्री असल्याचे समोर येते. नीताची ती लव्हस्टोरी सुरु होण्याआधीच संपल्याचेही ट्रेलरच्या सुरुवातीला स्पष्ट झाले. मात्र रागिणी मानेच्या (ईशा डे) डोक्यात संशयाचा किडा शिरतो आणि ती मकरंद ढवळेकडे (समीर चौघुले) नीता आणि गिरीश यांच्यावर नजर ठेवण्यासाठी मदत मागते.

आणखी वाचा – Video : “यांचा बालविवाह”, प्रथमेश परबला बायकोसह पाहून निवेदिता सराफांची प्रतिक्रिया, अशोक सराफांच्या जोड्याने पाया पडले अन्…

इतक्या वर्षांच्या गुलकंदाप्रमाणे मुरलेल्या या जोड्यांच्या संसारात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे खरोखर मीठाचा खडा पडला आहे का की, हा केवळ गैरसमज आहे हे चित्रपट प्रदर्शनानंतर स्पष्ट होईल. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित या चित्रपटात या चार सई ताम्हणकर, प्रसाद ओक, समीर चौघुले, इशा डे, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे ही कलाकारांची फौज दिसणार आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Tags: gulakandGulkand Trailermarathi movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Raj Sharma Passes Away
Entertainment

प्रसिद्ध कॉमेडियनचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन, बऱ्याच दिवसांपासून होते रुग्णालयात, मृत्यूचे कारण अस्पष्ट

एप्रिल 25, 2026 | 1:12 pm
Biplab Dasgupta death
Entertainment

वयाच्या ७५व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, रुग्णालयात नेतानाच वाटेत मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

एप्रिल 25, 2026 | 11:58 am
anupam kher sold mumbai home
Entertainment

भाड्याने राहायला सुप्रसिद्ध अभिनेत्याने विकलं घर, २२ वर्षात आलिया भट्टने घेतल्या अभिनेत्याच्या दोन्ही मालमत्ता, किंमत…

एप्रिल 25, 2026 | 10:18 am
Nehha Pendse tv shows
Entertainment

“त्याने मला अचानक पकडलं”, मुंबईच्या भररस्त्यात अभिनेत्रीसह घडलं असं काही की…; म्हणाली, “जवळ जाऊन…”

एप्रिल 25, 2026 | 9:57 am
Next Post
Tahira Kashyap Share Health Update

आयुष्मान खुरानाच्या पत्नीचा पुन्हा कॅन्सरचा लढा सुरु, आजाराबाबत मोठा खुलासा, म्हणाली, "खऱ्या नात्यांपेक्षा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.