शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दोन पाणीपुरी कमी दिल्या म्हणून महिलेचा त्रागा, भररस्त्यात थैमान घालत ट्रॅफिक जाम केलं आणि…; व्हिडीओ तुफान व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 20, 2025 | 2:19 pm
in Social
Reading Time: 1 min read
google-news
 woman protest for pani puri

दोन पाणीपुरी कमी दिल्या म्हणून महिलेचा त्रागा, भररस्त्यात थैमान घालत ट्रॅफिक जाम केलं आणि...; व्हिडीओ तुफान व्हायरल

woman protest for pani puri : सोशल मीडियावर आजकाल ट्रेंडिंग रील व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. असे अनेकदा व्हायरल रील पाहून हसू आवरत नाही, तर बरेचदा नव्याने काहीतरी शिकायला मिळतं. अशातच सोशल मीडियावर व्हायरल होणार एका स्त्रीचा व्हिडीओ पाहून हसावे की रडावे कळत नाही. माझ्यावर अन्याय झाला असं म्हणत तिने भररस्त्यात थैमान घातलं. आता या महिलेवरील अन्याय ऐकाल तर तुम्हालाही हसू अनावर होणार नाही. गुजरातच्या वडोदरा परिसरात एका महिलेने थेट रस्त्यावर बसून आंदोलन केलं. वीस रुपयांत सहा ऐवजी चारचं पाणीपुरी दिल्या या एकाच गोष्टीने गुजरातचे रस्ते ठप्प झाले.

ऐकून नवलंच वाटलं. वडोदरामधील सुरसागर परिसरातील ही घडलेली घटना अनेकांना हसवून गेली. एका स्त्रीने थेट पाणीपुरी वाल्याने पाणीपुरी कमी दिली म्हणून तांडव केला आणि भररस्त्यात ती रडत बसली. याने नेमकं काय झालं हे पाहायला गर्दी जमा झाली आणि रस्तेही इतके ब्लॉक झाले की, ट्राफिकने सगळंच ठप्प झालं. वाहतूक कोंडीने सगळ्यांचीच तारांबळ झाली. यावेळी पोलिसांनी संबंधित महिलेची समजूत घातली.

आणखी वाचा – दुकानं बंद केली, चाहते रस्त्यावरच रडू लागले आणि…; गायक झुबीन गर्गच्या निधनाने आसाम कोलमडलं, व्हिडीओ समोर

A woman went to have panipuri but was served 4 instead of 6 for ₹20.

She objected, sat down on the road in protest, and even broke into tears.

The twist? Kudos to Vadodara Police for stepping in and resolving this pani-filled crisis swiftly!pic.twitter.com/37DYZAOMkd

— Kumar Manish (@kumarmanish9) September 19, 2025

पोलिसांशी बोलताना सदर महिनेले सांगितले की, पाणीपुरीवाला नेहमीच कमी पाणीपुरी देतो, तसेच त्याला काही बोलल्यास माजही दाखवतो. महिलेच्या तक्रारीनंतर वडोदरा महानगरपालिकेतील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सदर तक्रारीवरुन आम्ही पाणीपुरी विक्रेत्यावर कारवाई करु शकत नाहीत. यासाठी अन्न सुरक्षा विभागाकडून त्याच्या खाद्यपदार्थांची तपासणी करावी लागेल.

आणखी वाचा – “जवळच्या व्यक्तीला वेळ देणं…”, प्रिया मराठेच्या निधनानंतर पतीची पहिली प्रतिक्रिया, शंतनू मोघे म्हणाला, ” सुख-दुःख खुंटीला टांगून…”

सदर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यावर नेटकऱ्यांनी गमतीशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दोन पाणीपुरीसाठी सत्याग्रह करायला लागला, असं गमतीत एकाने म्हटले आहे. दुसऱ्या एका नेटकऱ्याने, “पाणीपुरीसाठी चाहत्यांचा उत्साह एकदम भारी आहे. आपण गुजरात सरकारकडून याचं उत्तर मागितलं पाहिजे”, असं म्हटलं आहे. तर एकाने, “या महिलेनं न्यायालयात गेलं पाहिजे. कारण आजकाल न्यायालय विचित्र वाटणाऱ्या प्रकरणातही न्याय देत आहे”, असं म्हटलं.

Tags: pani puriviral videowoman protest
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
shardiya navratri 2025

यंदाच्या नवरात्रीत देवी दुर्गाला प्रसन्न करण्याचे १० खात्रीशीर मार्ग, सर्व संकट दूर होतील आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.