Gossip Girl Death : ‘बाफी द व्हँपायर स्लेअर’ आणि ‘गॉसिप गर्ल’ मधील भूमिकेसाठी प्रसिद्ध अभिनेत्री मिशेल ट्रेचेनबर्ग या अभिनेत्रीचे वयाच्या ३९ व्या वर्षी निधन झाले आहे. अलीकडेच अभिनेत्रीची लिवर ट्रांसप्लांट सर्जरी झाली होती. दरम्यान, ‘पेज सिक्स’ने नोंदवले आहे की, हे प्रकरण अभिनेत्रीच्या मृत्यूबद्दल संशयास्पद वाटत आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालात असे म्हटले आहे की, मिशेल ट्रेचेनबर्गच्या मृत्यूचे कारण अदयाप समोर आलेले नाही. स्रोताने प्रकाशनास सांगितले की, ट्रेचेनबर्ग बुधवारी (२६ फेब्रुवारी) सेंट्रल पार्क साऊथ येथील विलासी अपार्टमेंट कॉम्प्लेक्स वन कोलंबस प्लेसमध्ये दिसली होती.
अभिनेत्रीच्या मृत्यूबाबत असे सांगण्यात येत आहे की, न्यूयॉर्कमध्ये जन्मलेल्या मिशेलने अगदी लहान वयातच कारकीर्द सुरु केली. तेव्हा ती तीन वर्षांची होती जेव्हा तिने पॉप्युलर निक्लोडियन सीरीज ‘The Adventures of Pete & Pete’ मध्ये नोना मेकलेनबर्ग ही भूमिका साकारली होती. ‘आईस प्रिन्सेस’ आणि ‘१७ अगेन ‘सारख्या बर्याच चित्रपटांमध्ये ती दिसली आहे आणि त्यानंतर’ बफी द व्हँपायर स्लेअर ‘आणि’ गॉसिप गर्ल’ या टेलिव्हिजन मालिकांमधील तिच्या भूमिका विशेष चर्चेत आल्या.
काहिओ दिवसांपूर्वीच मिशेल ट्रेचेनबर्गने शेअर केलेल्या फोटोंमुळे ती चर्चेत आली. अभिनेत्रीचे हे फोटो पाहून लोकांनीही आश्चर्य आणि चिंता व्यक्त केली. चाहत्यांनी असे म्हटले होते की, ती आजारी आहे. अभिनेत्रीने लोकांच्या या टिप्पणीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली होती आणि म्हटलं होतं की, “मी कशी आजारी वाटत आहे ते मला सांगा. तुमचं कॅलेंडर हरवलं आहे का?. मी १४ वर्षांची नाही आहे आणि आता मी ३८ वर्षांची आहे हे तुम्हाला कळत नाही आहे”. अशा या कमेंटमुळे अभिनेत्री नाराज झालेली दिसली.