Sonakshi Sinha Interfaith Marriage : सोनाक्षी सिन्हाने जून २०२४ मध्ये अभिनेता झहिर इक्बाल यांच्याशी लग्न केले. दोघांनीही नोंदणी पद्धतीने त्याचा लग्नसोहळा उरकला. त्याच्या या लग्नाबद्दल खूप चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. आता सोनाक्षीने जातिबाह्य विवाह आणि धर्मावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सोनाक्षी व झहीर यांच्या जातिबाह्य विवाहसोहळ्याने या चर्चांना उधाण आलं आहे. झहीर आणि सोनाक्षीने जून २०२४ मध्ये त्यांच्या घरीच लग्न केले. या लग्नात केवळ जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते. घरच्या घरीच अत्यंत साधेपणाने त्यांचा शुभविवाह संपन्न झाला. सोनाक्षी व झहीर यांच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षी सिन्हा म्हणाली, “आम्ही धर्माकडे पाहत नाही. असे दोन लोक आहेत जे प्रेमात आहेत आणि एकमेकांशी लग्न करु इच्छित होते आणि त्यांचे लग्न झाले. झहीर माझा धर्म माझ्यावर लादत नाही. मी माझा धर्म त्यांच्यावर लादत नाही. आम्ही धर्माशी संबंधित काहीही सांगत नाही. आम्ही याबद्दल बोलत नाही. आम्ही एकमेकांची संस्कृती समजतो आणि त्याचे कौतुक करतो. मी माझ्या घरात काही परंपरेचे अनुसरण करते आणि मी त्याचा आणि त्याच्या संस्कृतीचा आदर करते. तो माझा आणि माझ्या कुटुंबाचा आदर करतो आणि हे असंच असायला हवे”.
आणखी वाचा – Video : धमाल-मस्ती, निर्सगाचा आनंद अन्…; अरुण कदमांचा नातवासह कोकण रेल्वेने प्रवास, साधेपणाने वेधलं लक्ष
पुढे सोनाक्षी सिन्हा म्हणाल्या, “लग्न करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे विशेष विवाह कायदा. जिथे एक हिंदू स्त्री ज्याला आपला धर्म बदलण्याची गरज नाही आणि एक मुस्लिम माणूस मुस्लिम म्हणून जगू शकतो. दोन लोक प्रेमात आहेत आणि ते विवाहबंधनात अडकतात. हे खूप सोप्पे आहे. आपण आपला धर्म बदलाल?, हा प्रश्नच नव्हता, आम्ही एकमेकांवर प्रेम करतो आणि आमचे लग्न झाले”.
सोनाक्षी सिन्हाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती ‘काकुदा’ या चित्रपटात दिसली. त्यात रितेश देशमुख आणि साकीब सलीमही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.