सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

महाराष्ट्राची लाडकी लेक बनली नॅशनल क्रश, निळ्या साडीतील ‘त्या’ फोटोची चर्चा, कोण आहे ती?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 12, 2025 | 11:41 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
who is girija oak

महाराष्ट्राची लाडकी लेक बनली नॅशनल क्रश, निळ्या साडीतील 'त्या' फोटोची चर्चा, कोण आहे ती?

who is girija oak : सध्या सोशल मीडियावर एका महिलेचे छायाचित्र लोकांमध्ये चर्चेत आहे. प्रत्येकजण एकच प्रश्न विचारत आहे, ही महिला कोण आहे? आता सर्वजण या सुंदर महिलेची चौकशी करत आहेत. ती कोण आहे आणि हे चित्र कुठले आहे त्याची उत्सुकता लागून राहिली आहे. ही मराठी अभिनेत्री म्हणजे गिरीजा ओक आणि ती अचानक एक्स (ट्विटर) वर सर्वाधिक चर्चेत असलेल्या नावांपैकी एक बनली आहे. निळी साडी आणि स्लीव्हलेस ब्लाउजमधील तिच्या फोटोंनी सर्वांमध्ये उत्सुकता वाढवली. एका हिंदी यूट्यूब चॅनेलवर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीच्या या क्लिपने तिच्या आकर्षक आणि उत्स्फूर्त शैलीने लोकांना आश्चर्यचकित केले.

अनेकांनी असे विचारले, “ही कोण आहे?”. सोशल मीडियावर तिच्यासाठी अप्रतिम कॅप्शन आणि दाक्षिणात्य अभिनेत्रींशी तुलना करत कमेंट्सचा पूर आला होता. हा फोटो लाखोंच्या संख्येत पाहिला गेला. आणि त्यानंतर नेटकऱ्यांनी तिचे नाव गुगल आणि इंस्टाग्रामवर शोधले आणि व्हायरल फोटोमध्ये अभिनेत्री गिरीजा ओक दिसली. सोशल मीडियावर कोणीही एका रात्रीत सेन्सेशन बनू शकते आणि अशातच अभिनेत्री गिरिजा ओक ही “न्यू नॅशनल क्रश” होताना दिसतेय.

आणखी वाचा – धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, घरी पोहोचताच कुटुंबीयांनी केली पोस्ट, म्हणाले, “त्यांच्यावर आता घरीच…”

मराठी, हिंदी आणि कन्नड चित्रपटांमध्ये देखील गिरिजानं आजवर काम केल आहे. ती अभिनेते डॉ. गिरीश ओक यांची लेक आहे. प्रेक्षक फॅन्स यांनी ती न्यू नॅशनल क्रश आहे असं देखील जाहीरपणे सांगितलं. कायमच तिनं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे तिनं अनेक दर्जेदार प्रोजेक्ट्समध्ये काम सुद्धा केलं आहे.

आणखी वाचा – धर्मेंद्र यांची विचारपूस करण्यासाठी देओल कुटुंब पोहोचलं रुग्णालयात, पण अभिनेत्याची पहिली पत्नी आहे कुठे?, चर्चांना उधाण

गिरिजा प्रत्यक्षात मराठी, हिंदी आणि कन्नड प्रोजेक्टमध्ये दिसली आहे. ‘तारे जमीन पर’ (2007) आणि ‘शोर इन द सिटी’ (2010) या बॉलीवूड हिट चित्रपटांव्यतिरिक्त, तिने ‘जवान’ (2023) मध्ये विशेष भूमिका साकारल्या आहेत. नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘इंस्पेक्टर जेंडे’ या चित्रपटातही गिरिजा ओकने काम केले आहे. यामध्ये तिने मनोज बाजपेयी यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

Tags: girija oakmarathi actressnational crush
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
dharmendra health update

मुलं रात्रभर झोपली नाहीत, खूप जबाबदाऱ्या आणि…; धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत हेमा मालिनी यांनी दिली अपडेट, म्हणाल्या, "देवाच्या हातात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.