शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“पूर्वी कुंकू, आता टिकली आहे”, कपाळाला कुंकू न लावणाऱ्या महिलांना नयना आपटेंनी सुनावलं, म्हणाल्या, “आता सौभाग्यवती…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 29, 2024 | 9:32 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
nayana apte

"पूर्वी कुंकू, आता टिकली आहे", कपाळाला कुंकू न लावणाऱ्या महिलांना नयना आपटेंनी सुनावलं, म्हणाल्या, "आता सौभाग्यवती..."

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर नवनवीन मालिका येत असलेल्या पाहायला मिळत आहेत. सध्या घरोघरी मातीच्या चुली या नव्या मालिकेने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. मालिकेत रेश्मा शिंदे व सुमित पुसावळे मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटेही भूमिका साकारताना दिसत आहे. नयना आपटे मालिकेत आजीच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. मालिकेतील नयना आपटे यांच्या भूमिकेनेही साऱ्यांचं मन जिंकलं आहे. (Nayana Apte)

मनोरंजन विश्वातील या जेष्ठ दिग्गज अभिनेत्रीने केवळ चित्रपटच नाही तर, नाटक आणि मालिकाविश्व देखील गाजवलं. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी नयना आपटे यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. अभिनयाचं बाळकडू त्यांना आई अभिनेत्री शांता आपटे यांच्याकडूनच मिळालं होतं. सध्या नयना आपटे छोट्या पडद्यावर सक्रिय आहेत. नुकतीच त्यांनी ‘इट्स मज्जा’ चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी कुंकू न लावणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे.

आणखी वाचा – Video : IPLच्या मॅचदरम्यान मैदानातच कुत्र्याला सुरक्षारक्षकांकडून लाथेने तुडवलं, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, “टीव्हीवर हे दाखवणं…”

नयना आपटे म्हणाल्या, “कपाळाला हल्ली कुंकू लावत नाहीत. कुंकू ही गोष्ट पूर्वी झाडापासून तयार केली जायची. आता टिकली आहे. आता सौभाग्यवती बाथरूम असते, बाई असते की नाही माहीत नाही. कुंकू लावणे हा एक योगाचा प्रकार आहे. कुंकू नेहमी तर्जनीने लावले जाते. आणि कपाळावर ज्या भागात कुंकू लावतात तिथे कुंडली जागृत असते. आपल्या मेंदूच्या मध्यभागेची नस तिथे जोडली आहे. रोजच्या रोज त्या भागावर मसाज केला गेला तर वायब्रेशन होऊन तुमचा मेंदु अलर्ट होतो. हे कुंकू लावण्यामागचं शास्त्र आहे. हे शास्त्र फार कुणी समजून सांगत नाही”.

आणखी वाचा – आजचे राशी भविष्य : ‘मेष’ ते ‘मीन’पैकी कोणत्या राशीच्या लोकांना मिळणार आज आर्थिक यश?, तुमचा आजचा दिवस कसा असणार? जाणून घ्या…

नयना आपटे यांनी आजवर ६० हून अधिक विनोदी, पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, संगीत व गुजराती नाटकांतून भूमिका केल्या आहेत. ’शांती’, ’वक़्त की रफ़्तार’, ‘एक चुटकी आसमान’, ‘डोन्ट वरी हो जायेगा’ या त्यांच्या हिंदीतल्या गाजलेल्या मालिका आहेत. तसेच त्यांच्या ‘चूकभूल द्यावी घ्यावी’, ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मराठी मालिकाही गाजल्या.

Tags: marathi actressNayana Aptenayana apte indian ritualnayana apte serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Hardik Joshi shared Goodnews

हार्दिक जोशीने खरेदी केली नवीकोरी महागडी कार, वडिलांना वाढदिवसानिमित्त भेटवस्तू दिली अन्…; फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.