गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रेश्मा शिंदे व तिच्या नवऱ्याचा मराठमोळा अंदाज, परंपरा जपत एन्जॉय करत आहेत लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव, फोटो समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 29, 2025 | 12:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Reshma Shinde Ganesh Festival

रेश्मा शिंदे व तिच्या नवऱ्याचा मराठमोळा अंदाज, परंपरा जपत एन्जॉय करत आहेत लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव, फोटो समोर

Reshma Shinde Ganesh Festival : कलाकारांच्या घराचा बाप्पा पाहायची ओढ साऱ्या प्रेक्षक वर्गात अधिक असते. कलाकार मंडळी हा सण कसा साजरा करतात, ते कसे तयार होतात हे पाहण्यास साऱ्यांना आवडतं. अनेक कलाकारांच्या घरी यंदा गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. दरम्यान, मराठी सिनेविश्वातील अनेक नवोदित जोडप्यांनी यंदा पहिला गणेशोत्सव साजरा केला आहे. यामध्ये अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव तिच्या सासरी अगदी पारंपरिक अंदाजात आणि थाटामाटात साजरा केला आहे. अभिनेत्रीने याचे खास फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

रेश्मा शिंदे हिने पवनसह लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नाच्या समोर आलेल्या फोटोंनी तर साऱ्यांना सुखद धक्का बसला. मालिकाविश्वातील हा लोकप्रिय चेहरा आता सासरी मराठी आणि साऊथ अशा दोन्ही पद्धतींनी गणेशोत्सव साजरा करत आहे. रेश्माचे सासर हे साऊथ इंडियन आहे. आणि मराठमोळ्या रेश्माने सासरच्याही पद्धती अत्यंत चोखपणे पार पाडल्या आहेत. लग्नानंतर रेश्माने तिचे प्रत्येक सण नवऱ्यासह अगदी आनंदात साजरे केले.

आणखी वाचा – अंकिता वालावलकरने पार पाडली सूनेची जबाबदारी, माहेरनंतर सासरच्या गणपतीच्या सेवेत रुजू, म्हणाली, “आयुष्यभर…”

View this post on Instagram

A post shared by Reshma Shinde (@reshmashinde02)

आता अभिनेत्री गणेशोत्सवासाठी खास तयार झाली आहे. काठपदरची खास साडी नेसून तिचा पारंपरिक लूक खूपच खास दिसत होता, तर रेश्माच्या नवऱ्याने सोहळ नेसले होते. दोघेही खूपच सुंदर दिसत होते. बाप्पाबरोबरचे फोटो शेअर रेश्माने कॅप्शन देत असं म्हटलं की, “लग्नानंतरचा पहिला बाप्पा. पहिलं पावन आगमन – आनंद, श्रद्धा आणि नव्या सुरुवातीचा मंगलमय क्षण! मोरया”. यावेळी त्यांच्या घरच्या बाप्पा जवळच्या सजावटीनेही साऱ्यांचं लक्ष वेधलं. केळीची पानं आणि फुलांची आरास करत त्यांनी खास सजावट केली.

आणखी वाचा – ऐश्वर्या नारकरांनी स्वतःच्या हाताने बनवले उकडीचे मोदक, गृहिणींना खास टिप्सही दिल्या, व्हिडीओ समोर

रेश्माने २९ नोव्हेंबर २०२४ रोजी पवनसह लग्नगाठ बांधली होती. दोघांचा प्रेमविवाह असून त्यांनी आधी मराठमोळ्या पद्धतीने व नंतर दाक्षिणात्य पद्धातीने अशा दोन्ही पद्धतीने लग्न केलं. त्यावेळी दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. सध्या रेश्मा ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेमुळे चर्चेत आली आहे.

Tags: ganesh festivalmarathi actressreshma shinde
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
 parag tyagi shefali jariwala ganpati

शेफाली जरीवालाच्या निधनानंतर नवऱ्याने केली घरच्या गणेशाची सेवा, व्हिडीओ पाहताच चाहत्यांनी केलं कौतुक, म्हणाले, "असा माणूस पाहिलाच नाही"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.